
सुधीर गणपत राउत चेक आऊट करुन मुंबई एयरपोर्ट च्या बाहेर आले. आपल्या मोबाईल मध्ये वेळ पाहिली, दुपारचे साडे-तीन झाले होते.
"आज ५
मार्च... २५ एप्रिल ला ज्योतिषांनी पंचांगानुसार ग्रुहप्रवेश करण्यासाठी उत्तम दिवस सांगितला आहे!
पटेलनी फोटो शेयर केला त्यावरून बंगला मोठा दिसतोय!"
पटेलनी फोटो शेयर केला त्यावरून बंगला मोठा दिसतोय!"
राऊत
ह्यांचे संपूर्ण कुटुंब, देश-परदेशात वेगवेगळ्या शहरात राहत असल्यामुळे राऊत व मुलांनी मुंबईलाच
एक प्रशस्त बंगला घेऊन एकत्र रहायचे ठरवले होते. म्हणून राऊत ह्यांनी ह्या बंगल्याची निवड केली.
राऊत
ह्यांची पत्नी राधिकाताई मुंबई युनिव्हर्सिटीत सिनियर प्रोफेसर म्हणुन कामाला होत्या, पण आता त्या रिटायर झाल्या होत्या.
मोठा
मुलगा विनय ह्यूस्टनला हार्ट-सर्जन होता. त्याची पत्नी अमोली- दिल्लीला एका इंटरनेशनल
कंपनीत टेलिकम्युनिकेशन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणुन जॉबला होती. त्यांची
मुले आरव, लक्ष, व रचित, तिघेही
पुण्याच्या अमिटी युनिव्हर्सिटी मध्ये शिकत होते.
राऊतांचा
मधला मुलगा सुशील, टाटा स्टील मध्ये वरिष्ठ मॅकेनिकल इंजिनियर म्हणुन कामाला होता तर त्याची पत्नी
सुनंदा बीएआरसी मध्ये मेडिकल ऑफिसर म्हणुन कामाला होती. त्यांचा मोठा मुलगा तनय चंदीगड युनिव्हर्सिटी मध्ये होता तर छोटी श्रीष्टी
मुंबईतच एन एम कॉलेजला
शिकत होती.
राऊतांची
सर्वात छोटी लेक द्रीष्टी, जिने श्रीष्टी चे बारसे केले
होते, एक विधवा होती! तिचे यजमान मेजर यशवंत नाडकर्णी ह्यांना छत्तीसगढच्या दंतेवाड्यात झालेल्या आतंकवादी हल्ल्यात वीरमरण आले होते. मेजर ह्यांच्या आयुष्यात दुसरे कोणीही नसल्यामुळे द्रीष्टी आपल्या वडीलांकडे परतली होती. द्रीष्टीचा मुलगा प्रणय हा मुंबई च्या एका शाळेत शिकत होता. ह्या मोठ्या कुटुंबात श्रीष्टी एकमेव मुलगी असल्यामुळे ती सर्वांची लाडकी
होती, खास करून द्रीष्टीची !
बंगल्याचा
फोटो राऊतांना खूप आवडला, परंतु प्रत्यक्षात पाहण्यासाठी ते खास नाशिक वरून
इथे आले होते.
अंधेरी
स्टेशन वरून बोरिवली ट्रेन पकडून राउत मलाड स्टेशनला पोहोचले.
"तुम
पुकारलो SSS तुम्हारा इंतेजार है !"
राऊत
ह्यांची मोबाईल रिंग वाजली. त्यांनी खिशातून आपला मोबाईल काढला.
"बोला पटेलभाई
! मी आत्ताच मलाड स्टेशन ला पोचलो." स्टेशन च्या फलकावर नजर टाकीत ते म्हणाले.
पटेल
: "चांगला चांगला" पटेल गुजराती शैलीत मराठी बोलला.
"सर! तुम्ही आसा
करा, ते बाहेर बगा, ऑटोवाल्यांची लाईन दिसते न? तिकडून शेयर
ऑटो करा, शेयर नाही मिलाली तर डायरेक्ट करा.
मी गोरेगावला भगत सिंघ नगर, फिश मार्केटला आहे, तुमाला
एड्रेस पाठवतो. रिक्षा वाल्याला बोला के पन्नालाल घोष
रोड वरून देसाई रोडला जायचेय. सोमवार बाजारला, रोडचा पहिला
लेफ्ट घ्यायचा, मग सेकंड लेफ्ट.
तिकडे मालाड सतगुरू सोसायटी हाय, तेचा पुढे, नेव्ही कॉलोनीचा लाइनीने बिल्डिंग हाय, तेचा शेवटी आपला बंगला हाय, तुम्हाला मुश्किल नाय पडणार शोधायला. मेसेज मध्ये डिटेल लिहतो, काही पिरोबिलेम असेल ना, तर फोन मारा."
"मारू? कोणाला?"
राऊत ह्यांनी थोडी गम्मत केली. तिथे पटेल उत्तरला, "हा हा हा!
अहो, ही मुंबईची
भाषा हाय, तुमी पण शिकून घ्या.
मी थोड्या वेलाने येते" म्हणत पटेल ने फोन बंद
केला.
राऊत
नी काही ऑटोवाल्याना शेरिंग चे विचारले, एकाने
डायरेक्ट ऑटो करायचा सल्ला दिला.
राऊत
विचार करू लागले, 'शेयर ऑटो मिळणे कठीण दिसतेय.' एक ऑटोवाल्याला थांबवले
व सोमवार बाजार सांगितले.
राउत
ऑटोत बसले. मेसेजची रिंग वाजली. राउतनी मोबाईल पहिला. सांगितल्या प्रमाणे पटेलनी व्यवस्थीत पत्ता पाठवला.
"पन्नालाल घोष वरून राइट ला देसाई रोड घे, तिथे २ लेफ्ट टर्न मारून थांबव."
"साब ! हिंदी
मे बोलो ना ! वैसे आपका बात समझा पर अपुनको मराठी
नही आता ज्यादा." ऑटो ड्रायवर.
"कोई बात नही! समझा न बस!" राऊत म्हणाले. "अब मुंबई मे रहने है तो मराठी तो सिखनी पडेगी न?" राऊतांचा सल्ला!
वळणे-वळणे घेऊन ऑटो शेवटी देसाई रोडला आली आणि दोन डावी वळणे घेऊन सतगुरू सोसायटी पार करत रस्त्याचा डेड एन्डला थांबली.
"साब ! ये
रहा नेव्ही कॉलोनी का धी एन्ड
! और ये बाजूका बंगला
है ना साब, उधर कभी जाना मत आप ! "
"क्यू?" मीटर
चे पैसे देत राऊत नी जरा चमकुनच
विचारले. "मालूम नही ! पर सुना है
कई साल से बंद है
ये बंगला!"
"तुम टेन्शन मत लो, मै खोल दूंगा!" हसत हसत राऊत म्हणाले. ऑटो ड्रायवर काहीशा विचित्र नजरेने राऊत कडे पाहत राहिला व झटकन ऑटो वळवली व धूम पळाला !
सुधीर
राऊत थोडे चकित झाले ! 'आता ह्याला काय झाले ? ' हा विचार त्यांना पडला !
राऊतांनी वळून एक नजर त्या
बंगल्यावर टाकली. बंगला झाडून स्वच्छ केलेला दिसत होता !
टुमदार बंगला
दिसायला फार छान दिसत होता. राऊतांनी लगेच बाहेरून बंगल्याचा आपल्या मोबाईल ने एक फोटो
घेतला. पुढे मेन गेट व त्या नंतर
मोठे आंगण पाहून राऊत ना तो लगेचच
आवडला ! शिवाय बंगल्याची गच्ची देखील दिसत होती. अंगणाच्या डाव्या बाजूला एक पिंपळाचे झाड
देखील होते. मेन गेट ला मात्र मोठाले
कुलूप ठोकले होते !
ते
पटेलला फोन लावणार होते तितक्यात एक निळ्या कलरची
मारुती सुझुकी डिझायर कार आली व त्यातून पटेल स्वतः
बाहेर पडले !
" मी पटेल
! आपन पहिल्यांदाच भेटतोय !" पटेल ने शेक हॅन्ड
साठी हात पुढे केला.
राऊत
ह्यांनी देखील झटकन शेक हॅन्ड करून म्हटले " बंगला दिसायला छान दिसतोय!"
"आवडला ना!
मला गेरेन्टी होती, तुमाला आवडनार म्हनुन ! हे पहा मी
पेपर पन संगतीला आनले, पन
पहिला तुमी बंगला आतून बघा, एकदम झकास आहे ! तुमाला पसंद पडेल नक्की. जबरजस्त मोठा आहे. कार्पेट २३५० स्क्वेयर फुट आहे!" पटेल ने अधिक माहिती देत गेट उघडले!
बंगल्याचा
मुख्य दरवाजा उघडून पटेल ने राऊतना
आत यायला सांगितले.
बंगला
आतून प्रशस्त होता ! मधोमध ऐसपैस जागा होती, त्यात सोफे, खुर्च्या आदी फर्निचर होते. उजव्या आणि डाव्या बाजूने वरच्या मजल्यावर जाण्यासाठी पायऱ्या होत्या. सगळे फर्निचर पद्धतशीर पणे सफेद कपड्याने झाकले होते.
"हे वरती
सीडी वरून गेले कि दोनी बाजूला
दहा-दहा रूम आहेत~ त्यात किचन, बेडरूम, हॉल, मीडिया रूम, स्टडी रूम, खूप काही आहे!" पटेल चे बोल चालूच
होते.
पण
राऊतांचे लक्ष खालच्या भिंतीवर असणाऱ्या फोटो-फ्रेमवर होते. दोन्ही बाजूने वर जाणाऱ्या पायऱ्या
लगत खालून वर पर्यंत, काहीशा
अंतराने अनेक फोटो-फ्रेम होते. ज्यात कुठे वाहने होती, कुठे पशु-पक्षी होते.
वाहन्यांच्या
फोटो मुळे राऊत जरा गोंधळले होते. 'असतात काहींच्या आवडी-निवडी' असा त्यांच्या मनात विचार आला.
एका
फोटो ला पाहून राऊत
जरा जास्त चकित झाले !
"पटेल भाई
! ही मारुती सुझुकी डिझायर गाडी......"
"हा हा
हा ! तेचा काय झाला!" पटेल नी लागलीच राऊत
ना मध्येच रोखले.
"हा मॉडेल
मला इतका आवडला की हा फोटो
बघूनच वाटले की गाडी पाहिजे
तर अशीच. नाही तर नाही! मग
काय, घेतली!
अगदी एलिगंट आहे ना? तुमी या वरती, वरचा
फ्लोर दाखवते, तेचा वरती टेरेस हाय, आनी मोठा स्विमिंग पूल, टेरेस गार्डन, सगला हाय!"
"पण कार-
बाईक ह्यांचे फोटो?" राऊत ह्यांचे मन त्या वाहनांच्या
फोटोत घुसळत होते !
"आय मीन
बंगल्याचे मालक आपटे काय गाड्यात डील करत होते?"
"हो साहेब!
त्यांना बघा खूप सोख ! टू-व्हीलर, फोर-व्हीलर वर तेंचा जीव होता.
पण
तेचा लई वाईट झाला.
तेचा आख्खा फेमिली चंदारच्या रोड एक्सीडेंट मध्ये गेला, वेरी सेड!
मी
तुमाला पहिला बोललें ना एक्सीडेंट चा ! तवा पासून तेंचा मुडच गेला, म्हणुन ते मुंबई सोडून
ओक्लाहोमाला कायमचा निघुन
गेला."
"अमेरिका?" राउत
नी विचारले.
"हो, तिथूनच
हे बंगल्याचा मेंटेनंस पाठवतात मला." पटेल नी स्पष्टीकरण केले.
राऊत
नी सगळं बंगला पालथा घातला. त्यांना बंगला खूप आवडला. संपूर्ण बंगल्याचा त्यांनी व्हिडियो पण बनवला.
"राऊत साहेब!
" पटेल ने बंगला पाहण्यात
गर्क असलेले राऊतना विचारले.
" कसा काय
वाटला तुम्हाला बंगला?"
राऊत
म्हणाले, " माझ्या मोठ्या फॅमिली साठी सूट करतो !"
"मग तर
बेस झाला!" पटेल खुश होऊन म्हणाला !
"तुमचा फेमिली
कधी येनार?" पटेल ने पुढे विचारले.
"आम्ही पुढच्या
महिन्याच्या शेवटी येऊ.आमच्या ज्योतिषांनी गृह प्रवेश साठी एप्रिलची २५ तारीख शुभ
मुहूर्त म्हणून उत्तम असल्याचे सांगितले आहे. त्यादिवशी नाही जमले तर पुढची शुभ
मुहुर्ताची तारीख ठरवू. सर्वांशी बोलुन आणि हा विडीयो दाखवून
पुढचे ठरवीन ! शेवटी सगळे मेम्बर्स वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. सगळी कडून वाइंड अप करायची प्रोसेस चालू आहे."
सगळ्यांना
बंगला आवडल्या वर फायनल करायचे
ठरले होते.. अनामतची अरधी रक्कम पटेल ना रोख म्हणून
देणार, तसे त्या करारनाम्यात नमुद करायचे ठरले. आपट्यांचे पावर ओफ एटोर्नीचा
फोटो राउतांनी मोबाइल ने घेतला. जरुरी
कागदपत्रे घेउन राऊत नी रजिस्ट्रेशन साठी
पुढच्या आठवड्याची तारीख पक्की केली. पटेल नी संमती दर्शवली.
बोलता
बोलता, दोघे ही जिन्यावरून खाली
उतरले.
ह्या
वेळेला राउतांचे लक्ष पटेलशी बोलण्यात असल्याने त्यांचे गाडीच्या फोटोंवर लक्ष नव्हते.
एका
फोटोत बजाज पलसर बाइकचे चित्र होते, ज्यातून आता पेट्रोल गळत होते!!
[] [] []
अनिरुद्ध
बापट आज खुप खुश
होता. त्याच्या DTH कंपनीने फिल्ड मेनेजर मधुन प्रमोशन देउन हेड मेनेजर बनवले होते. त्याचे
सीटीसी देखिल खुप वाढले होते.
अनिरुद्ध
ला पुण्यात राहणारे त्याच्या पालकांना हि खुश खबर
सरप्राईज म्हणून द्यायची होती, सोबत त्यांच्यासाठी काही शॉपिंग करायची होती.
आपल्या
साठी व घरच्या मंडळी
साठी शोपिंग करण्यासाठी तो त्याच्या पल्सरनी
मलाडच्या लिंक रोडवर असलेले इंफिनीटी व डी-मार्ट
ला जात होता!
तो
एस व्ही रोड ने उंदेराई मार्ग
घेऊन पन्नालाल घोष मार्गावर (पी जी रोड)
आला. ह्या रोड ने त्याला सरळ
लिंक रोड ला जायचे होते.
मध्ये त्याला बाबा वडा पाव सेंटर दिसले. वडा पाव त्याचा फेव्हरेट! लागलीच त्याने बाईक साईड ला लावली व ऑर्डर दिली.
तिथे
पन्नालाल घोष मार्गाला एका दिशेने महंत लेन तर दुसऱ्या दिशेने
देसाई रोड जोडत होता, ज्यामुळे त्या चौकावर रहदारी बरीच होती. वडा पाव खाता खाता त्याच्या खास मैत्रिण, म्हणजे गर्लफ्रंड स्वातीचा फोन आला. आपल्याला मिळालेली प्रमोशन विषयी तो तिला सांगता सांगता त्याने बाईक चालू
केली.
तिचा
फोन आल्याने तो फारच एक्साईट झाला
होता. बाईक वळवताना त्याच्या लक्षात नाही आले की त्याने बाईक पी जी रोड वर
सरळ नेण्या ऐवजी देसाई रोड मध्ये नेली ! कारण पार्किंग करताना बाईकचे तोंड देसाई रोडच्या दिशेला होते!
अजून
त्याचे फोनवर हसणे खिदळणे चालूच होते !
काही अंतर पुढे गेल्यावर त्याच्या लक्षात आले कि त्याने एक चुकीचे वळण घेतले आहे.
"स्वाती! एक मिनिट हं, मी तुझ्याशी बोलता बोलता रॉंग लेन घेतली. पुढे एक अजून लेफ्ट टर्न आहे. तिथून परत मागे येतो. बऱ्याच दिवसांनी फोन केलास तू!"
"बऱ्याच दिवसांनी?
अर्रे घेतलीस कि काय दिवसा ढवळ्या? काल
सकाळी तर बोलणे झाले
आपले !"
"अग तेच
ते, आय मीन... बऱ्याच
तासांनी !" त्याला हसू आवरेनासे झाले.
" आणि काय
रे! मला लोकांकडुन कळले की तुला प्रमोशन
मिळाले ! पण तुला वेळ
नाही मला सांगायला?
प्रितीने मला सांगितले आणि तू काय भाव खायला लागलास? एक फोन पण नाही करू शकत मला?" स्वाती रुसव्या फुगव्यात ओरडली. अनिरुद्ध नी बाइक साईड ला लावली.
प्रितीने मला सांगितले आणि तू काय भाव खायला लागलास? एक फोन पण नाही करू शकत मला?" स्वाती रुसव्या फुगव्यात ओरडली. अनिरुद्ध नी बाइक साईड ला लावली.
"अग अग
थांब, जरा धीर धर ! मला श्वास तरी घेऊ दे! मला आताच मेसेज आला ऑफिस मधून. खरं तर मी चार वाजता निघालो होतो, ऑफिसच्या ड्युटीवर. तिथे पार्टीशी बिझी होतो, फोन सायलेंट वर होता. आत्ताच
पाऊण तास अगोदर मिटिंग संपली व निघालो, तर
बघतो काय? मोबाईल ची बेटरी संपली,
म्हणून बाईकवर चार्जिंग साठी ठेवला. बाबांचा मेसेज आला तेंव्हा कळले कि अगोदर ऑफिसचा
मेसेज आला होता. शिवाय प्रीतीचा, अलीचा, आणि राजेशचा पण मिसकॉल आला
होता. फर्स्ट, बाबाना फोन केला पण त्यांचा फोन
आऊट ऑफ रेंज होता."
"राहू दे तुझे एस्क्युजेस! नेहमीचे आहे ते! तुम्ही मार्केटिंगची माणसे ना, कधी विश्वास ठेवावा कधी नाही, काहीच कळत नाही."
"अग ए
स्वाती, प्लिज, तू माझी स्पेशल
फ्रेंड आहेस, मार्केटिंग नाही करत तुझ्याशी, अग प्रेम करतो तुझ्याशी!
खरंच सांगतोय.आत्ता मी, हे काय ते, पी जी रोड, हा,
पी जी रोड वर
होतो मी, तिथे क्रॉसिंग वर मस्त पैकी
वडापाव चे दुकान दिसले,
पोट भरून खाल्ले, तितक्यात तुझा फोन आला ! मला घरच्यांसाठी व तुझ्या साठी
शॉपिंग करायचेय, त्यासाठी मी डि-मार्ट ला
आणि इन्फिनिटी ला जातोय. तुझ्याशी
बोलता बोलता रस्ता चुकलो, इथे लेफ्ट टर्न आहे, तिथून बघतो. बर, शॉपिंग झाल्यावर तुला फोन करतो, बाय !"
असे म्हणून परत बाईक चालू केली !
असे म्हणून परत बाईक चालू केली !
थोडे
पुढे गेल्यावर त्याला एक डावे वळण
दिसले. त्याने विचार केला की दोन डावी
वळणे घेतल्याने तो परत वडापाव
सेंटर ला येईल. नाही
आलो तर लिंक रोड
ला जायचा रस्ता कोणीही सांगेल. अगदीच काय तर रिवर्स मारीन. असा विचार करत त्याने बाईक चालू ठेवली.
परंतु
अचानक अघटित घडले ! अनिरुद्ध च्या बाईकची गती वाढली ! तो पार गोंधळून
गेला. त्याने ब्रेक मारायचा भरपूर प्रयत्न केला परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही ! बाईक ची गती विमाना सारखी वाढली !
हळू
हळू त्याला चक्कर येऊ लागली. आणि काही कळायच्या आत त्याची बाईक
तोल जाऊन जमिनीवर आपटली व तो बाइक
सकट जमिनीवर आपटून रस्त्यावर फरफटत गेला !! त्याचा उजवा पाय सोलत गेला व भयंकर यातने ने त्याला भोवळ येऊ लागली !
अचानक
आकाशात वीजा कडाडू लागल्या, मेघांचा गडगडाट इतका मोठा होता की त्या आवाजात
कोणता ही आवाज कोणाला
ऐकू येत नव्हता !
त्याने स्वतःला सोडवण्या साठी भरपूर प्रयत्न केला, परंतु त्याचे हात बाईकच्या हॅण्डल वरून निघतच नव्हते! अगदी चिटकून गेले !!
त्याला
शेवटी एक गेट दिसला,
परंतु त्याच्या डोऴ्याला अंधारी आली, भयंकर वेदनेने तो तळमळत होता आणि क्षणार्धात तो
बेशुद्ध झाला!
गेट
आपोआप उघडला गेला ! बाईक न थांबता, त्याच्या
सकट फरफटत गेली! रक्ताचे कारंजे उडत होते! अनिरुद्ध चा उजवा मांस निघत होते! कोणत्यातरी अदृश्य शक्तीने अनिरुध्ध व बाईकला अक्षरशः जमिनीवर फरफटत नेले. पुढे बंगल्याच्या पायऱ्या आल्या, त्याही ओलांडून दोघांना खेचत ती शक्ती पुढे जाऊ लागली, दरवाजा आपोआप उघडला गेला !!! अनिरुद्धच्या
पायाच्या मासांचे तुकडे उडत आसपास विखुरले गेले! दोघे आत फरफटत गेले
!! त्यांच्या मागून तो दरवाजा आपोआप बंद झाला !
मधोमध
ऐसपैस जागा होती. तिथे बेशुद्ध अनिरुद्ध
बाईक सकट खेचला गेला व बरोबर मध्य
भागी ती अदृश्य शक्ती त्यांना घेऊन आली !
अचानक
वरती छताला टांगलेल्या झुम्मर मधून एक प्रकाश खाली
उतरू लागला. जसा जसा प्रकाश खाली येत होता, तसा तसा तो जलद गतीने
गोल गोल फिरू लागला, त्याचा व्यास वाढतच गेला !
त्या
प्रकाश झोतात इतकी शक्ती व गर्मी होती
की बघता बघता अनिरुद्ध व त्याची बाईक
त्यात शोषले गेले, वरच्या दिशेला खेचले गेले व आणि बघता बघता दोन्ही चक्क गायब झाले! मग तिथे भयाण
शांतता पसरली !! ना तिथे प्रकाश
होता, न अनिरुद्ध, न
त्याची बाईक होती व ना ही
त्याच्या रक्ताचे डाग आणि त्याच्या पायाच्या मांसाचे तुकडे तिथे दिसत होते ! शिवाय बाईक च्या
ओरबडण्याचे निशाण देखील गायब झाले !!
जणू काही तिथे काही घडलेच नाही!!
रस्त्यावर
बराच वेळ कल्लोळ माजला होता. काही मुले तिथे घाबरलेल्या स्थितीत तोतडे बोल बोलत होती व काही मोठी
माणसे त्यांना धीर देत होती !
ह्या भयानक
घटनेच्या वेळेला रस्त्यावर तीन मुले
गोट्या खेळत होते. पापण्या लवण्याच्या आत ती बाइक
त्यांच्या समोर फरफटत त्या बंगल्यात गायब झाली !
मुलांची
बोबडी वळली होती. हे सगळे इतके झटकन
घडले की त्यांना आपण
जणू काही दु:स्वप्न पाहतोय
की काय असा भास झाला !
त्या मुलांना पुसटसे आठवत होते की बाईक एका माणसा बरोबर गेट पर्यंत फरफटत गेली ! परंतू मोठ्यांना विश्वास बसत नव्हता कारण रस्त्यावर कोणत्या ही खुणा दिसत नव्हत्या !
मोठी
माणसे गोंधळलेली होती, कारण ते तिघे घाबरलेली
मुले एकाच सुरात बोलत होती, परंतु त्यांच्या बोलण्याला पुरावा म्हणून तिथे काहीच त्यांना दिसत नव्हते!
त्या बंगल्याविषयी
आजवर मोठ्यांनी कैक भुताटकीच्या गोष्टी ऐकल्या होत्या, त्यात आज अजुन एका
गोष्टीची भर झाली ! मोठे
देखिल संभ्रमात होते! एक मुलगा असता तर ठीक पण इथे तर तिघेही एकाच गोष्ट सांगत होते ! आणि त्या प्रकारा मुळे तिघांची बोबडी वळली होती ! नक्की काय भुताटकी झालीय काही कळेनासे झाले त्यांना !
शेवटी
त्या मुलांच्या पालकांची सगळ्यांनी समज काढली, काहींनी त्यांची नजर उतरवायचा सल्ला देखिल दिला !
काही
तास कुजबुज चालली, काहीं जण कडकडाटचा
प्रकार सुद्धा भुटाटकी शी जोडू लागले
!
पण
त्यांच्या मनात एक गोष्ट मात्र
घर करू लागली! 'तो' एक भुत बंगला आहे!
[] []
[]
तुम
पुकारलो SSS तुम्हारा इंतेजार है !
राउतांची
मोबाईलची रिंग टोन वाजली.
"बोला पटेल
भाई!"
"मला विचारायचे
होते तुमी कधी निघतात तिकडून?"
"आम्ही पुढच्या
आठवड्यात तिथे येतोय!" राऊतांनी स्पष्ट केले.
"ओह! व्हेरी
नाईस! निघायच्या अगोदर एक फोन मारा
म्हंजे मी कामवाली बाय
ला साफ-सफाई साठी पाठवते."
"ओह सो
नाईस ऑफ यु!" राऊत
म्हणाले.
"अरे साहेब
! आपटे साहेबांनी डायरेक्शन दिलाय,
तुमाला कसला बी त्रास व्हायला नाय पाहिजे." पटेल म्हणाले.
"जरूर! आम्ही
सगळे बाय रोड येणार. आमचे सामान आमच्या अगोदर मूव्हर्स & पेकर्स घेऊन निघणार पण आम्ही पोचल्यावर
त्यांची गाडी येईल."
" तुमचा आख्खा
फेमिली येणार का ?" पटेल नी विचारले.
"नाही, काही
नातवंड पुढच्या महिन्यात येतील."
"ठीक आहे
तर तुमी तिथून निघताना ...." पटेल ना मध्येच
अडवून राऊत म्हणाले "मारतो फोन, डोन्ट वरी!" राऊतांना पण पटेलची सवय
लागली !
[]
[] []
क्रमश:
No comments:
Post a Comment