Sunday, May 10, 2020

शास्त्रीय देऊळ ! - (विधी व रीती)- भाग - १



 
मित्र हो ! हिंदू धर्म ज्याला सनातन धर्म देखील म्हणतात, त्यात असलेल्या काही करायच्या व न करायच्या गोष्टी नमुद केल्या आहेत ज्याला वैज्ञानिक आधार आहे. जेणेकरून, तुमची पुढची जागरूक पिढी तुम्हाला हे का ते का असे प्रश्न विचारतील तेव्हा त्याचे त्यांना उत्तर देऊ शकाल व ते स्वतः हा लेख वाचतील तेंव्हा त्यांना हिंदू धर्माविषयी ओढ लागावी   

                म्हणून हा प्रयत्न.                                                
                                                                                                                        ⌂⌂⌂⌂⌂⌂⌂⌂⌂              


देऊळ वा मंदिर स्थापित करणे हा केवळ कले पुरता विषय नाहीतर ते एक विज्ञान आहेजिथे पण देवळे बांधली आहेत त्या सगळ्या वास्तूचे निर्माण कार्य विज्ञानावर आधारित आहे ! होय देऊळ निर्मिती ही उच्चस्तरीय विज्ञानावर आधारित आहे

भारत देश हा प्रगल्भ संस्कृती आणि परंपरा साठी प्रसिध्ध आहे. विविध आकार, आराखडा वेगवेगळ्या स्थळी आपल्याला ही मंत्रमुग्ध करणारी वास्तू, जिथे जिथे हिंदू संस्कृती फोफावली होती तिथे तिथे त्यांचे दर्शन आज ही दिसत आहे, दुर्दैवाने परकीय आक्रमणा मुळे कैक देऊळ भंग अवस्थेत आहेत.

आपण देवळात जाण्याचे कारण फक्त आशीर्वाद पुरते नाही पण मानसिक शांतता सकारात्मक मानसिकता प्राप्त करण्यासाठी देखील जातो.   

आता पाहू या कोणत्या वैज्ञानिक आधारावर होते देऊळ निर्मिती!

     १.      देवालयाचे स्थान रचना.
             
  

देऊळ निर्मिती साठी सर्व प्रथम अशी जागा निवडतात जिथे उत्तर-दक्षिण दिशेच्या विद्युकीय चुंबकीय लहरीचा संगम होतो. ज्यातून सकारात्मक लहरी ची मोठया प्रमाणात निर्मिती होते. इथे मूर्ती-स्थापना देवळाच्या गर्भात करण्यात येते, ज्यास गर्भगृह वा मूलस्थानं देखील म्हटले जाते. 

वास्तूत: मूर्ती स्थापना ही अशा ठिकाणी करण्यात येते जिथे सकारात्मक लहरी उच्च प्रमाणात केंद्रित होतात. ह्या मूलस्थानं ठिकाणी पृथ्वीच्या चुंबकीय लहरीं अत्यंत सक्रिय असतात
                                                        

मूर्ती स्थापना झाल्यावर देऊळ निर्मितीचे काम सुरु करण्यात येते. खरं पाहता देऊळ एक लघु ब्रह्मांड आहे, ज्यात केंद्र स्थानी देवमुर्ती सभोवती पंचतत्त्व असतात. देवळात स्वतंत्र बुद्धिमत्ता असलेले देवता असतात ज्यातून सतत ऊर्जेचे विकिरण होते.

मुळत: देऊळ अशा मोकळ्या जागी स्थापित केली जातात, जेथे मनाची अंतर्गत चळवळ होते आणि सहज पणे ध्यान लागते. वास्तुकले पासून पूजा विधीच्या सर्व क्रिया ह्या जाणीव पूर्वक निर्माण केल्या गेल्या आहेत, ज्याने माणसाचे मन शांत राहते ध्यानात रमते



India - Rules of conduct for Visiting a Hindu Temple and Mosque
 





    
.       देवळात अनवाणी प्रवेश करणे :

देवळात सकारात्मक उर्जे सह चुंबकीय आणि विद्युत 
क्षेत्राचे शुद्ध स्पंदने आहेतपौराणिक काळात देवळे अशा प्रकारे बांधली गेली की देवळाच्या मध्यभागी असलेली 
जमीन सकारात्मक स्पंदनांचे प्रभावी वाहक बनतात ते आपल्या पायातुन शरीरात प्रवेश करतात. म्हणून प्रत्येक देवळात अनवाणी प्रवेश करण्याची प्रथा आहे.


.      देवळात प्रवेशताना घंटा वाजवणे - ज्ञानेंद्रिय सक्रिय करणे हेतू :
Significance of Ringing a Bell in Puja Ritual, Benefits of Ringing ...
अनवाणी प्रवेशाचे दुसरे कारण असे म्हणतात कि बूट
चप्पले आदी पादत्राणे आपण घालून सर्वत्र फिरत असल्याने, त्यात घाण, किटाणू आदी लागलेले असतात ज्यामुळे देवळातले शुध्ध वातावरण दूषित होते नकारात्मक ऊर्जा निर्माण होते.





आपण मूर्तीच्या मूलस्थानी म्हणजे देवळाच्या गाभाऱ्यात प्रवेश करतो तेंव्हा गाभाऱ्या बाहेर असलेली घंटा वाजवूनच जातो, तशी प्रथा आहे. ह्या मागे पण शास्त्रीय कारण आहे.   
    
घंटा नादच्या कंपनाने आपल्या मेंदूच्या डाव्या आणि उजव्या कप्पा एकत्र जोडल्या जातात. जेंव्हा आपण घंटा वाजवतो तेंव्हा त्याचे तीक्ष्ण आणि टिकाऊ स्वर प्रतिध्वनीच्या रूपाने आपल्या मेंदूत सेकंद घुमत राहतात. आणि ह्या प्रतिध्वनीच्या कालावधीत आपल्या शरीरात असलेले सात उपचार केंद्र सक्रिय होतात. जेणेकरून आपल्या मेंदूत असलेली नकारात्मक ऊर्जा नष्ट पावते.
घंटा नांदा मागे अजून एक कारण सांगितले जातेपूर्वी देवळ्यांना दारे नव्हती  त्यांची निर्मिती ही डोंगऱ्याच्या पायथ्याशी वा जंगलात उभारली जात होतीह्यामुळे  देवळात प्राणीपक्षीकिटके आदी निवाऱ्याकरिता देवळात येण्याची दाट शक्यता असेपरंतु ह्या घंटा नादाने  त्याच्या प्रतिध्वनी मुळे हे वन्यजीवन फार वेळ तिथे थांबू शकत नाहीम्हणून अद्याप आपल्याला कैक देवळे दिसतील ज्याच्या गर्भस्थानात ऊर्जेचा संचार दिसेलदेवळात स्वच्छता दिसेल  कोणतेही वन्य जीवन दिसत नाही.

.      मूर्तीपुढे कपूरचा दिवा पेटवणे : दृष्टी सक्रिय होते.
 




मुख्यत्वे देवळाचा गाभा हा प्रकाशहीन असतो. आपण पूजा करताना आपले डोळे मिटून ठेवतो जेंव्हा आपण डोळे उघडतो, तेंव्हा डोळ्याला मूर्ती समोर पेटत असलेला कापूर दिसतो. तिमिरात जळत्या कापूर चा प्रकाश हे डोळ्यांना सक्रिय करतात.








.      देवाच्या मूर्तीला फुलांचे अर्पण करणे: आपल्या श्वसन इंद्रियेला सक्रिय करते. 


फुलांचे कैक वैशिष्टय असतात. फुले दिसायला सुंदर असतात, सुवासिक असतात, त्यातली अमृताची चव जिभेला प्रसन्न करणारी असते. ह्या सगळ्या गोष्टीचा एकत्रित आनंद घेण्यासाठी देऊळ ही एक श्रेष्ठ जागा असते. सर्वच फुले देवाला आपण अर्पित करीत नाही. गुलाबाच्या पाकळ्या, जासवंद, झेंडू आदी  फुले अनेक घटक युक्त असतात, त्यापैकी सुगंध हा सर्वोच्च घटक आहे. फुलांचा दरवळणारा सुगंध, कापूर चा सुवास सुगंधित अगरबत्त्या आदींचा संगम हा आपल्या श्वसन इंद्रियांना सक्रिय आनंदित करतात, जेणेकरून मनाला अभूतपूर्व शांती मिळते.

.      मूलस्थान वा गर्भाला प्रदक्षिणा घालणे.

गर्भस्थानात असलेली देवाची मूर्ती ही घंटा नाद, कापूरची गर्मी शोषुन घेते व सकारात्मक उर्जेला कंप स्वरूपात निर्माण करते, जी गाभाऱ्यात काही काळासाठी हवेत राहते. गर्भात आपली पाच इंद्रिये कार्यान्वित होतात त्यामुळे ही सकारात्मक ऊर्जा, आपले शरीर गाभार्याला प्रदक्षिणा घालत असताना शोषून घेते.

.      कपाळी पुजाऱ्या कडून तिलक लावून घेणे. 


आपल्या भुवयांच्या मध्य भागी मज्जातंतू बिंदू असतो. पुरातन काळापासून शरीर विज्ञान ह्याची पुष्टी करीत आले आहे. शेंदुरी तिळक हा शरीरातील उर्जेला रोखून ठेवतो, व ध्यानाच्या कैक स्तरावर नियंत्रण ठेवतो. भुवयांच्या मध्य ठिकाणी तिळक लावताना आज्ञा - चक्रावर दाब देतो, जेणेकरून चेहऱ्याच्या पेशीना योग्य रक्त पुरवठा होतो. 


.      हिंदू देवळात मूर्ती दर्शन साठी नारळ व केळी का अर्पित केली जातात? 


केळी व नारळ हे जगात फक्त दोन फळे असे आहेत की ज्याच्या आवरणामुळे फळ आतून कोणी उष्ट करीत नाही. उदाहरणार्थ, सफरचंदाचे झाड खाल्लेल्या सफरचंदाच्या बी मधून उगते. केळी सॅम्पलिंग करून उगवली जातात व नारळ तसेच्या तसे, न फोडता, जमिनीत पेरले जाते. ह्या कारणामुळे ह्या दोन फळांना धार्मिक विधी मध्ये शुध्ध मानले जातात.

.      शंख वाजवणे.  


शंख ध्वनी हा ओम अक्षरांशी संबंधित आहे. ओम हा ध्वनी निर्मितीतला पहिला स्वर आहे. कोणत्याही शुभ कार्यासाठी शंख नाद करण्यात येतो. शंखाचा आवाज हा खूपच शुद्ध स्वरूपाचा असतो ज्यामुळे नवीन आशा व उल्हासाची निर्मिती होते.  व देवालयाच्या गाभाऱ्यातून निर्मित होणारी सकारात्मक ऊर्जा ह्या शंख नादाला अधिकच बळकट करते. ज्यामुळे श्रध्दाळू वर ह्याचा विस्मयकारक व सकारात्मक परिणाम होतो.

१०.     देऊळ कोणत्याही विशिष्ठ धर्माच्या  मालकीचे नसते.

देऊळ हे फक्त हिंदू धर्मा पुरते नाही. देऊळ कोणत्याही विश्वासाला जोडून नसते. देऊळ हे फक्त लोकांसाठी एक मार्गदर्शक आहे.मशीद चर्च इथे ही हेच साध्य होते. सगळेच रस्ते आपल्याला एकाच ठिकाणी नेतात.
जेंव्हा तुम्हाला चिंतनाचे खोलवर अनुभव होतात तेंव्हा तुमच्या मनात एक देवळाची निर्मिती होते.


वि वा


No comments: