मित्र हो ! आपण भाग १ मध्ये देवळा संबंधी काही विधी / रीती, ज्या वैज्ञानिक आधारावर आहेत, त्यावर जाणून घेतले.
हिंदू धर्म, ज्याला सनातन धर्म देखील म्हणतात, त्यात नमुद केलेल्या, काही करायच्या व काही न करायच्या गोष्टी मी आज मांडीत आहे, ज्याला वैज्ञानिक आधार आहे. जेणेकरून, तुमची पुढची जागरूक पिढी तुम्हाला हे का, ते का असे प्रश्न विचारतील तेव्हा त्यांचे त्यांना उत्तर देऊ शकाल व ते जेंव्हा स्वतः हा लेख वाचतील तेंव्हा त्यांना हिंदू धर्माविषयी ओढ लागावी.
म्हणून हा प्रयत्न.
⌂⌂⌂⌂⌂⌂⌂⌂⌂
आज आपण महाभारत, रामायण व द्वारका नागरी आदींचे पुरावे पाहत आहोत.
आपण पहिल्या भागात काही बाबींवर वाचन केलंय.
चला आज आपण अजून काही बाबीं व त्यांची वैज्ञानिक कारणे जाणून घेऊया.
हिंदू आपल्या जीवनात काही पारंपरिक विधी रीती पार पाडत/असतो, मग तो भारतात राहो की परदेशात आपल्या धर्माचा वैज्ञानिक आधार हा परदेशातल्या अनेक लोकांना
मंत्रमुग्ध करतात.
आज कैक परदेशी नागरिक हिंदू धर्म स्वीकारत आहेत. रशियात तर आज ह्या धर्मांतराची लाटच पसरलीय.
आता जाणून घेऊया काय आहेत ती वैज्ञानिक कारणे !
विधी/रीत क्र. १ : स्वागता साठी नमस्कार करणें :
नमस्कार किंवा नमस्ते ही आपणास भेटणाऱ्या व्यक्तीचे स्वागत करण्या- साठी अभिवादन करण्याची फार जुनी परंपरा आहे; हा इतरांना मान देण्याचा एक प्रकार आहे. नमस्कार करण्याची एक पद्धत आहे. दोन तळवे एकत्र जोडताना, दोन्ही हाताची बोटे परस्पर बोटांना जोडली जातात, ह्या कृतीने कान, डोळे आणि मनाच्या बिंदूंवर एक दबाव निर्माण होतो. ह्यामुळे भेटणारी व्यक्ती आपल्या कायम लक्षात राहण्यास मदत होते. नमस्ते च्या ह्या पद्धती मुळे आपण हाथ-मिळवणी चा प्रकार टाळतो व अशा तर्हेने आपण संभावित जंतूंच्या संसर्गात येत नाही.

आज कोरोना मुळे संपूर्ण जगात नमस्कार करायची पद्धत रुजू लागलीय, कैक देशांचे प्रमुख देखील हाथ-मिळवणी व आलिंगन देण्याचा रिवाज न अवलंबिता एकमेकांना नमस्कार करताना दिसतात! जेणे करून एखाद्याचा आजार दुसर्याला लागू नये ही ह्या मागे कल्पना!
ही वैज्ञानिक कारणे किती दूरदृष्टीची आहेत हे ह्यावरून दिसून येते !
विधी / रीत क्र. २. पायांच्या बोटात रिंग घालणे:
हिंदू विवाहित स्त्री दोन्ही पायाच्या अंगठ्याच्या जवळच्या बोटात रिंग घालते. ह्या दोन्ही पायांच्या बोटातून एक नस स्त्रीच्या गर्भाशया मार्फत हृदयात जाते. रिंगमुळे रक्ताभिसरणाला चालना मिळते व गर्भाशय निरोगी राहते. रक्ताभिसरण व्यवस्थित झाल्यामुळे स्त्रियांना मासिक पाळी देखील नियमित होते. ह्यात चांदीची अंगठी सर्वोत्तम. कारण चांदी ही उत्तम ऊर्जावाहक आहे व
जमिनी मधून ध्रुवीय ऊर्जा शोषुन ती संपूर्ण शरीरात पसरवते.
विधी / रीत क्र.३. नदीत तांब्याची नाणी टाकणे:
ही प्रथा साधारणपणे भारत व्यतिरिक्त बर्याच देशात आढळते. परंतु या परंपरेमागे वैज्ञानिक कारण आहे; प्राचीन काळी लोक तांब्याची नाणी वापरत असत. हा धातू आपल्या शरीरासाठी ऊर्जा वाहक म्हणून काम करतो; पाण्यात तांब्याची नाणी टाकल्यामुळे नदीचे पाणी शुध्ध होते व ते पिण्यालायक होते. अशा तर्हेने लोक नदीच्या पाण्यात तांबे टाकून पाणी प्यायचे.
विधी /रीत क्र. ४ : जेवणाची सुरुवात तिखट
अन्नाने व शेवट गोडीने करणें :
आपण जेवणाची सुरुवात तिखट पदार्थाने करतो व शेवट गोड अन्नाने करतो. वैद्यकीय विज्ञाना प्रमाणे तिखट वस्तू पाचक रस व आम्ल कार्यान्वितकरते ज्यामुळे पचन शक्ती मोठ्या प्रमाणात कार्यान्वित होते व
जेवण पचते.
गोड पदार्थात कार्बोहायड्रेट्स असतात जे पचन क्रिया मंद करतात.
म्हणून जेवण झाल्यावर गोड पदार्थ खायची रीत आहे.
विधी / रीत क्र. ५: हात-पायांना मेहंदी लावणे:
मेहंदी मध्ये अनेक औषधी गुण असतात. भारतात विवाह प्रसंगी मानसिक ताण वाढवणारी घटना घडू शकते, व काही अशा विधी/रीती असतात. कधी काळी लग्नप्रसंगी वधूला ताण, डोकेदुखी व प्रसंगी ताप देखिल येतो. मेहंदी स्वभावाने शीतल असते ज्यामुळे आपणास विवाहात होणाऱ्या त्रासापासून बचाव करते, म्हणून विवाहात वर-वधू ना मेहंदी लावण्याची रीत आहे.
विधी / रीत क्र. ६: जमिनीवर बसून खाणे:
भारतात आणि पूर्वेच्या काही देशात सुखासन स्थितीत बसून जेवण्याची पद्धत आहे. मग ते दुपारचे जेवण असो व रात्रीचे.
योगामध्ये सुखासन एक महत्वपूर्ण आसनाचा प्रकार आहे. पायाची घडी मारून बसण्याने शरीरात शांती पसरते. जी पचनक्रियेत साहाय्य करते. आपल्या मेंदूला एक संदेश जातो, जो आपल्या पोटातल्या अवयवांना जेवण पचन करण्यासाठी निर्देश देतो !
विधी / रीत क्र. ७ : उत्तरेला डोके करून कधी
आपल्या शरीरात चुंबकीय ऊर्जेचा संचार चालू असतो आणि पृथ्वी स्वतः एक विशाल चुंबक आहे. जर आपण उत्तरेकडे डोके ठेऊन झोपलो तर शरीराचे चुंबक पृथ्वीच्या चुंबका- शी पूर्ण पणे विरोधात जातात. ह्या मुळे ब्लड प्रेशर शी संबंधित समस्या निर्माण होतात आणि ह्या विरोधाचा आपल्या हृदयावर विपरीत परिणाम देखील होतो. हृदयाला ह्या चुंबकीय असमानतेला दूर करण्यास अधिक जोराने काम करावे लागते.
ह्या शिवाय आपल्या रक्तात मोठ्या प्रमाणावर लोह असते, जे आपल्या मेंदूकडे खेचले जातात. ज्यामुळे डोकेदुखी, अल्झायमर, मेंदूची
कार्यक्षमता कमी होणे, पार्किन्सनचा आजार व मेंदूच्या पेशींचे नाश
पावणे इत्यादी गंभीर आजार उद्भवू शकतात.
विधी / रीत क्र. ८ : कान टोचणे:
कान टोचण्याने बौद्धिक क्षमता वाढते, विचार करायची शक्ती व निर्णय घेण्याची क्षमता वाढते. असे म्हटले जाते कि जितके जास्त आपण बोलू तितके अधिक प्रमाणात ऊर्जा वापरली जाते व कान टोचल्याने आपल्या अतिरिक्त बोलण्यावर संयम घालता येतो.
ह्याशिवाय आपल्या उद्धट वागणुकीवर देखील नियंत्रण घालता येते.
शिवाय कानाच्या विकारांवर देखील ह्या प्रथेमुळे अंकुश घालू शकतो.
आज ही प्रथा फक्त भारतातच नव्हे तर परदेशात देखील दिसत आहे.
विधी / रीत क्र. ९ : डोक्यावर शेंडी ठेवणे :
आयुर्वेदाचे मुख्य सर्जन सुश्रुत ऋषींनी आपल्या डोक्यावर असलेला अधिपती मर्म हा सर्वोच्च संवेदनशील भाग म्हटल्याचे नमूद केले आहे. इथे सगळ्या नसा, गाठीच्या स्वरूपात एकत्रित होतात. ज्यास शिखा देखील म्हणतात. त्या जागे खाली, आत मेंदूत ब्रह्मरंध्रचे स्थान आहे. ब्रह्मरंध्र म्हणजे १२ शारीरिक शक्ती चे समूह. शरीराच्या खालच्या भागातून मज्जातंतू म्हणजे सुषुम्न हे ब्रह्मरंध्रला जुळले जातात. योगात ब्रह्मरंध्रला सर्वोच्च स्थान आहे. त्याला सप्तचक्र देखील म्हणतात ज्याला सहस्त्र कमळ पाकळ्या असतात.
ही गाठ रूपी शिखा मेंदूच्या मध्यस्थानाचे रक्षण करते. हे बुध्धी मत्तेचे केंद्र आहे. शिखे ची गाठ ह्या भागाला चेतना देते व ओजस नामक सूक्ष्म ऊर्जेची रक्षा करते.
विधी / रीत क्र. १० : सूर्याला जल अर्घ्य देणे :
हिंदू सगळ्या नैसर्गिक घडामोडीची पूजा करतो. सूर्याला तो ऊर्जेचा स्रोत मानतो. सूर्योदय वेळी त्याची जल अर्पण करून उपासना करतो. जल अर्घ्य देण्याच्या क्रियेत तो पाण्याने भरलेला तांब्या, फुल आणि तांदूळ त्यात ठेऊन, दोन्ही हाताने उंच धरतो, व
मिश्रण सोडतो. खाली येणाऱ्या पाण्याच्या धारेतून तो सूर्याकडे पाहतो. ह्या प्रक्रिये मुळे डोळ्याची दृष्टी सुधारते.
ही प्रक्रिया करण्यात विलंब केल्यास सूर्यकिरणे प्रखर होतात व ती आपल्या डोळ्यांना नुकसान करू शकतात. सूर्योदया वेळी किरणे अगदी सौम्य असतात.
ह्या विधी / रीती मुळे आपण प्रात:काळी उठून आपली प्रात:कालीन विधी / रीती उरकतो. कोवळ्या उन्हाचा भरपूर उपयोग करून घेण्याचा ह्या मागे उद्देश असतो. प्रात:काळी उन्हाला सनशाईन व्हिटामिन देखील म्हटले जाते. कारण ह्या किरणा ने आपल्याला व्हिटामिन डी मिळते.
आयुर्वेद, हा ग्रंथ औषध व औषधी वनस्पतीवर आधारित आहे, त्यात नमूद केलेआहे कि आपल्या अनेक आजाराचे कारण आपल्या अंगात असलेले विषारी तत्वआहे. शरीर जमलेल्या विषारी तत्वांना साफ करते. ही प्रक्रिया सतत चालू असते.
उपवासा मुळे अन्नाद्वारे आपल्या शरीरात उत्पन्न होणाऱ्या विषारी तत्वाच्या वाढीत खंड पडतो व
सतत चालू असलेल्या पचन क्रियेला देखील विराम मिळतो. ही प्रथा फक्त हिंदूच नव्हे तर इतर धार्मिक लोक देखील पाळतात. मुस्लिम लोकांचा रमझान महिना हा एका
दृष्टीने उपवासाचा प्रकार आहे.
उपवासामुळे पचनक्रिया तसेच इतर अवयवांना देखील आराम मिळतो.
अशा रीतीने उपवास आपले स्वास्थ टिकवण्यासाठी खूपच उपयुक्त आहे, परंतु शरीरात ऊर्जेचे प्रमाण टिकवण्यासाठी उपवासाच्या दिवशी लिंबूपाणी वेळोवेळी घेणे जरुरी आहे.
विधी / रीती क्र. १२ : आपण वयस्कच्या चरणांना स्पर्श का करतो?
आपल्या शरीरात एका टोका पासून दुसऱ्या टोकापर्यंत लौकिक ऊर्जेचा संचार होतो. हृदय व
मन ह्या लौकिक ऊर्जेशी जोडलेले असतात.
हस्तांदोलन व मिठी मारण्याने ही ऊर्जा एका शरीरातून दुसऱ्या शरीरात शिरते. ही ऊर्जा आपल्या बोटांच्या टोकाद्वारे आपल्या शरीरात प्रवेश करते. म्हणून जेंव्हा आपण वयस्करांच्या पायी पडतो तेंव्हा त्यांच्या शरीरातून लौकिक ऊर्जा आपल्या शरीरात प्रवेश करतात. ह्या प्रकारे आपली बोटे रिसिव्हर (प्राप्तकर्ता) आहे, वयस्कचे पाय गीवर (देणारे) आहेत.
जगातले सर्व वृक्ष दिवसा प्राणवायू सोडतात, तर रात्री कार्बन-डायॉकसाईड सोडतात. मात्र पिंपळ हे एकमेव वृक्ष आहे जे चोवीस तास ऑक्सिजन सोडतो. म्हणून ह्या वृक्षाचे जतन करण्याच्या हेतूने आपल्या पूर्वजांनी पिंपळाची पूजा करण्याची रीती सुरु केली होती, जी आजवर आपण पाळतो.
विवाहित आपल्या कपाळी कुंकू लावण्यामागे शारीरिक कारण आहे. कुंकू औषधी हळद, लिंबू व पारा ह्या धातूने बनवला जातो.
पारा धातू हा आपल्या शारीरिक आकर्षणाची भावना प्रज्वलित करतो. त्यामुळे कदाचित विधवा कपाळी कुंकू लावत नाही. कुंकूचा योग्य उपयोग व्हावा म्हणून Pituitary Gland (मेंदूच्या मागच्या पृष्ठभागाच्या मध्यात असलेली नलिकाविरहित ग्रंथी) पर्यंत कुंकू लावण्यात येतो, ज्यामुळे हॉर्मोन्सची निर्मिती होते, जी शारीरिक व कामुक भावनांची निर्मिती करते. असे मानण्यात येते कि पारा धातू ताण देखील कमी करतो.
विधी / रीती क्र. १५ : आपण तुळशीची का पूजा करतो?
तुळशीत कैक औषधी गुण असतात. हिन्दु तुळशीला मातेचा दर्जा
देतो. वनस्पति शास्त्रात बेसिल नावाने ओळखली जाते, ज्यात अनेक रोग प्रतिकारक तत्वे असतात. तुळशीच्या रोजच्या सेवनाने आपल्या शरीरात रोग प्रतिकारक शक्ती वाढते. तुळस रोगांना वाढून देत नाही व प्रकृती स्वस्थ राहण्यास व
आयुष्य दीर्घ काळ राहण्यास मदत होते.
तुळशीच्या गंधाने मच्छर व इतर कीटक दूर राहतात, तसेच मानले जाते कि साप देखील तुळशीच्या जवळपास फिरकत नाही.
ह्या मुळे शतका पासून लोक आपल्या अंगणात तुळस वृन्दावनाची
स्थापना करतात.
विधी / रीती क्र.१६:आपण मूर्तिपूजा का करतो?
माणसाच्या मानसशास्त्रात असे म्हटले आहे कि माणूस एखादी वस्तू सतत पाहत असतो, तेंव्हा त्याच्या मनावर त्या वस्तूचा व गोष्टीचा परिणाम होतात. मनाला आकार त्याप्रमाणे मिळतो.
शतकापासून मूर्तिपूजेची पद्धत चालू आहे. मूर्तीचे ध्यान मनात ठेऊन त्याप्रमाणे आपण ध्यान लावून पूजा करतो, मनाला ह्या प्रक्रियेने अविरत समाधान मिळते. ध्यान लावून आध्यात्मिक ऊर्जा मिळवता येते. देवळात पूजा करते वेळी मनाची एकाग्रता केंद्रित होते.
शरीरात मनगट हा भाग सर्वात क्रियाशील अवयव आहे, जिथे खूपच ऊर्जेचा वापर होतो. स्त्रिया काम करत असताना मनगट व बांगड्याचे सतत घर्षण चालू असते. ज्यामुळे रक्ताभिसरण वाढायला मदत होते. त्याशिवाय विद्युत ऊर्जा जी शरीरा बाहेर निघते, बांगड्यामुळे ती ऊर्जा परत स्त्रियांच्या परत जाते.
बांगड्याच्या गोलाकार मुळे, व त्यात टोक नसल्या मुळे, अंतहीन
असल्यामुळे ऊर्जा बांगड्या बाहेर जात नाही व
परत शरीरात जाते.
विधी / रीत क्र. १८ : आपण नित्यपणे देवदर्शन
का घेतो ?
विद्युत व चुंबकीय लहरी चा प्रवाह सतत आपल्या जमिनीत चालू असतो. आपण पहिल्या भागात देवळाची निर्मिती विषयी वाचले आहे कि कसे व कोणत्या ठिकाणी देवळाची मूर्ती स्थापित होते व सभोवती देवळाचे निर्माण केले जाते. ह्यात वास्तुकार आणि अभियंते (Engineer) ह्यांचा सल्ला घेऊनच जागा ठरवली जाते.
देवाच्या मूर्ती भोवती देवळाची निर्मिती ला प्राणप्रतिष्ठा म्हटले जाते.
मूर्ती स्थापना अशा ठिकाणी केली जाते जिथे भूगर्भात चुंबकीय लहरी खूप मोठ्या प्रमाणात वाहत असतात. प्रथम तिथे जमिनीवर तांब्याचा एक पत्रा, ठेवला जातो. ज्यावर वेदिक लिपीत विशिष्ठ मंत्र कोरले जातात. ज्यावर मूर्ती स्थापना होते.
हा तांब्याचा पत्रा जमिनी खालील चुंबकीय उर्जेला शोषून घेतो व तो संपूर्ण गर्भगृहात पसरवतो.
म्हणून आपण जेव्हा जेव्हा ह्या मूर्तीची व देवळाची प्रदक्षिणा
घड्याळाच्या दिशेने म्हणजे क्लॉकवाईज घालतो, तेंव्हा तेंव्हा ही चुंबकीय ऊर्जा आपल्या शरीरात शोषली जाते. ह्या कारणाने नित्य नियमाने देवळात जाण्याने आपले स्वास्थ देखील चांगले राहण्यास मदत होते. ह्याच चुंबकीय ऊर्जेमुळे देवळात अनवाणी जाण्याचे कारण आपण पहिल्या भागात वाचलंय.
विधी / रीत क्र. १९ : आपण हळद अंगावर का
लावतो?
हळद एक अशी जडी-बुटी आहे, ज्यात कैक औषधी गुण असतात.
निसर्गाने त्यात खूप अँटी-सेप्टिक भरलेले आहे. त्यामुळे शरीरावर ह्याचा लेप लावल्यामुळे नुसते त्वचे वरचेच नव्हे तर त्वचेच्या आतले किटाणू-विषाणू शोषून हळद त्यांचा नायनाट करते, व त्वचेला चमक मिळते. त्वचेला नमी आणण्यासाठी हळदीत काही लोक तेल देखील मिसळतात.
विधी / रीत क्र. २० : विवाह प्रसंगी अग्निकुंड
पेटवण्यात येतो:
ह्या अग्निकुंडाच्या हवन मुळे, हवेतील नकारात्मक ऊर्जेचा नाश होतो व सकारात्मक ऊर्जा निर्माण करते. अनेक प्रकारचे लाकडे, ज्यात अनेक औषधी घटके असतात, त्याशिवाय घी, औषधी जडी-बुटी, तांदूळ व
काही जडी-बुटी आदींचा ह्या हवनात स्वाहा केला जातो. अग्निकुंडाचा धूर वातावरणातील दूषित घटकांचा नाश करतो. त्या स्थळी उपस्थित लोकांच्या प्रकृतीवर चांगला परिणाम होतो. सर्वाधिक फायदा जोडप्याना अग्निकुंडा जवळ बसल्याने होतो.
विधी / रीत क्र. २१ : प्रवेशद्वाराशी तोरण
ताजी पाने हवेचे निर्जंतुकरण करते. विवाह, गृहप्रवेश आदी शुभ प्रसंगात वातावरण स्वच्छ असणे गरजेचे असते.
आंब्याच्या पानाने लालित्य वाढते, त्यामुळे घराच्या मुख्य द्वारावर आंब्याची पाने रोवलेली तोरणे लावती जातात.
विधी / रीत क्र. २२ : ओम शब्द उच्चारणे:
ओंकार चे उच्चारण रक्त दाब नियंत्रित ठेवतो व हृदयाची गती देखील नियमित करतो. दीर्घ श्वास घेऊन ओंकाराचे उच्चारण केल्याने सतर्क पणा जागरूक राहतो. परिणामी ध्यान शक्ती वाढते.
विधी / रीत क्र. २३ : प्रार्थनेत गायत्री मंत्र का
गायले जातात?
गायत्री मंत्र उच्चारण केल्या मुळे प्रति सेकंड एक लाख दहा हजार प्रकारच्या ध्वनी लहरी उत्पन्न होतात! गायत्री मंत्राच्या अनेक वैज्ञानिक संभाव्यतेची संशोधकांनी पुष्टी केली आहे.
सूर्योदया पूर्वी गायत्री मंत्र ९० मिनिटासाठी गायली तर त्याने आपल्या
स्वास्थ साठी मोठ्या प्रमाणात चालना मिळते.
गायत्री मंत्र :
ॐ ॐ ॐ
ॐ भूर् भुवः स्वः
तत् सवितुर्वरेण्यं
भर्गो देवस्य धीमहि
धियो यो नः प्रचोदयात् !
दक्षिण आफ्रिका देशाच्या पॅरामारीबोच्या रेडिओ स्टेशन मध्ये रोज सायंकाळी ७ वाजता गायत्री मंत्र प्रसारित होतात!
दक्षिण आफ्रिका देशाच्या पॅरामारीबोच्या रेडिओ स्टेशन मध्ये रोज सायंकाळी ७ वाजता गायत्री मंत्र प्रसारित होतात!
आशा आहे मी हा हिंदू धर्मात असलेल्या विधी वा रितीमागे असलेल्या वैज्ञानिक दृष्ट्या असलेले तार्किक महत्व समजावण्यात समर्थ झालो.
मी पुन्हा सांगू इच्छितो कि ह्या विधी वा रीती हिंदू धर्माची मालमत्ता नाही. उद्भवणारे प्रसंग वा परिस्थिती व
देवाची आराधना करण्यासाठी व
एकंदरी आपल्या भल्यासाठी ह्या विधी वा रीतीआपण पाळत आहोत.
ह्या गोष्टींचा स्वीकार करणे म्हणजे हिंदू धर्म स्वीकारणे हे कदापि नाही, हे वेगळे सांगण्याची गरज नाही.
जय हिंद !























No comments:
Post a Comment