Wednesday, August 12, 2020

बोळ : भाग २



Neral - 54 bungalows in Neral - Mitula Homes

पुण्याच्या गोखले नगर ला असलेल्या सुखनिवास अपार्टमेंट मध्ये धनंजय बापट राहायचे.
रात्रीचे साडे-दहा वाजले होते. त्यांच्या घरचा फोन खणखणलाधनंजय बापट फोन पाशी जवळ-जवळ धावतच आले झटकन फोन उचलला.

"हॅलो ! कोण?" धनंजय अतिशय काळजी च्या स्वरात बोलले.


"अंकल, मी स्वाती तळपदे, अंधेरीतुन बोलतेय !"

"स्वाती? कोण स्वाती? सॉरी मी नाही ओळखले," धनंजय थोडे गोंधळले.

"मी मुंबईतून स्वाती, अनिरुद्ध ची फ्रेंड ! संध्याकाळी मी त्याला फोन केला होता, त्याला प्रमोशन मिळाले म्हणून! पण त्याला स्वतःला ही गोष्ट माहित नव्हती, कारण तो बिजनेस मिटिंग साठी बाहेर गेला होता नंतर त्याच्या मोबाईलची बेटरी डाऊन झाल्यामुळे कंपनीचा मेसेज, स्टाफ चे कॉल, इव्हन तुमचा कॉल देखील त्याला कळला नाही, नंतर त्याने तुम्हाला कॉल केला होता पण तुमचा फोन एंगेज होता. त्याने मला तसे सांगितले.
माझ्याशी बोलताना तो ड्राइव्ह करत होता, अनफॉर्च्युनेटली तेंव्हा त्याचा रास्ता चुकला. त्याला मॉलला जायचे होते, तुमच्या साठी खरेदी करायची होती ! त्याने मला सांगितले कि खरेदी झाल्यावर तो कॉल करेल .
मी घरी पोचल्यावर माझी आई आजारी पडल्या मुळे तिला डॉक्टर कडे घेऊन गेली होती, त्यामुळे मी रात्री नऊ पर्यंत त्याला फोन करू शकले नाही.  परंतु मग मी त्याला खूप वेळा फोन केले पण सारखे एंगेज आऊट ऑफ रेंज ! तुमचे त्याच्याशी काही बोलणे झाले का ?"

"नाही बेटा, मला त्याचा मिसकॉल आला होता पण त्यानंतर मी देखील त्याला सतत कॉल करत होतोपरंतु मला देखील आऊट ऑफ रेंजचा मेसेज येत होताबेटा, तू त्याच्या ओळखीचे पण त्याच्या गेस्ट हाऊस च्या जवळ राहणाऱ्या लोकांना सांगतेस का तिथे जाऊन तपास करायलाआम्ही पण इथे सगळे खूप काळजीत आहोत."
"ओके अंकल तुम्ही काळजी नका करू. आमच्या ऑफिस मधल्या मुलाला मी पाठवते, त्याच्या लॉजिंगला. I will keep you informed!तुम्ही काळजी नका करू, प्लिज! "

स्वाती ने झटकन अलीला फोन केला त्याला सगळी डिटेल सांगितली. अली आणखी दोन जणांना घेऊन अनिरुद्धच्या लॉजिंग वर गेला पण अद्याप अनिरुध्ध तिथे पोचलाच नव्हता !
अलीने स्वातीला फोन करून सांगितले. स्वातीची काळजी वाढली! तिने त्याला सांगितले कि तिचे काका मलाड पोलीस स्टेशनला इन्स्पेक्टर आहेत, आत्ता तिथे ड्युटी वर आहेत, तू फटाफट जा तिथे, मी त्यांना कळवते!

अली मित्रांबरोबर मलाड पोलीस स्टेशन ला गेला.
इन्स्पेक्टर विजय तळपदेंचा मोबाईल वाजला. जरा चमकून गेले, स्वातीचा इतक्या रात्री फोन बघून.
"हा बेटा बोल, काही प्रॉब्लेम झालाय का ? दादांची तबियत तर ठिक आहे ना?"

"काका! बाबांना काही झाले नाही, ते तर ठिक आहेत, आई पण ठिक आहे, एक, एक गडबड झालीय !"
माझा ऑफिस चा कलीग आहे अनिरुध्ध, तो संध्याकाळी मलाडला बाईक ने इन्फिनिटी मॉलला जात होता, माझ्याशी बोलताना रस्ता चुकला म्हणून फोन कट करून पुढे निघाला. आत्ता कळले कि तो कुठेच पोचला नाही  ! चक्क हरवलाय !!
मला जाम टेन्शन आलय, माझा दुसरा कलीग अली, त्याच्या अंधेरीच्या गेस्ट हाऊस ला जाऊन आला, पण अनिरुध्ध अद्याप तिथे परतलाच नाही ! मी अलीला तुमच्या कडे पाठवलय. प्लिज तुम्ही फाईंड आऊट करा प्लिज, मला खूप भीती वाटू लागलीय !"

इं. विजय थोडे गोंधळले, पण सावरत म्हणाले "बेटा, बाबांना फोन दे, तू काळजी करू नकोस मी तपास करतो. शेवटी तो कुठे होता ?"

"काका, तो इथेच पी जी रोड ला होता व तिथे कोणते तरी वडापाव चे दुकान होते, तिथे वडापाव खाऊन, तो आय थिंक, समोरच्या रस्त्यात घुसला. असे त्याने मला फोन वर सांगितले. तो म्हणाला कि दि-मार्ट ला शॉपिंग झाल्यावर मला कॉल करेल . पण त्यानंतर अजून त्याचा मोबाईल स्विच ऑफ येतोय !"

"कळले, म्हणजे पी जी रोड ला जायच्या ऐवजी देसाई रोड ला गेला असेल. तुझा मित्र आला तर मी फोर्स घेऊन निघतो, डोन्ट वरी, टेन्शन घेऊ नकोस."

इन्स्पेक्टर विजय नी फोन ठेवताच अली त्यांना शोधत त्यांना भेटला.
"अली ?" "हा सर मै अली!"
"आओ मेरे साथ !" इन्स्पेक्टर विजय ने गाडी काढली, एक सब-इंस्पेटर दोन कॉन्स्टेबल ह्यांना सोबत घेऊन निघाले, अली आणि मित्र बाईकवर पोलिसांच्या पाठी निघाले ! 

"हमे जल्द से जल्द उस वडापाव वाले के पास जाना है, वही पर हमे कोई क्लू मिलेगा !" इं विजय ने   सब इन्स्पेक्टर चौबे ला सांगितले.     
वडापाव सेंटर ला पोचल्या वर इन्स्पेक्टर विजयनी अलीला विचारले.
"अलीऊस लडके की बाईक कौन सी थी?"
" सर, पल्सर की, १२५ नियॉन, निले रंग कि थी, डार्क ब्लु " अलीने बाईक चा नंबर देखील दिला.
लवकरच ते त्या बाबा वडा पाव सेंटर वर पोचले.

दुकानावर असणाऱ्या मालकाने पुष्टी केली कि संध्याकाळचे बरोब्बर सहा वाजले होते जेंव्हा अनिरुद्ध तिथे आला होता. कारण अनिरुद्धला वडापाव देताना त्याच्या मोबाईलचा अलार्म वाजला होता.
"पुढे?" इन्स्पेक्टर विजय ने विचारले.
"सर, खाने के बाद वो सामने वाले रोड से गया."
"देसाई रोड से ?" "जी सर" दुकानवाल्याने सांगितले
स्वाती ने सांगितले होते तेच दुकानवाल्यानी देखील सांगितले. इन्स्पेक्टर विजय सब इन्स्पेक्टर चौबे ला सांगितले की अनिरुद्ध फोन वर बोलता-बोलता चुकून त्या गल्लीत गेला, खर तर त्याला ह्या पी जी रोड नी लिंक रोडला जायचे होते, असे त्याने स्वातीला सांगितले, तो चुकून समोरच्या ह्या रोड मध्ये गेला  चूक कळल्यावर त्याने लेफ्ट घ्यायचे ठरवले. "सो, पहले हम वहा जाते है, कोई क्लू मिलेगा." 
चौबे: " जी सर!" .
"वो यहा आने पर समझा के उसने गलत रास्ता लिया. पुढे लेफ्ट टर्न आहे, गाडी लेफ्ट घ्या."
"बहुतेक त्याने दुसरा लेफ्ट टर्न घेऊन परत पी जी रोड वर यायचे ठरवले असेल. पण पुढे तर डेड एन्ड आहे. तिथे आपल्याला क्लू मिळेल, चला !"
" अच्छा हुआ! इसका मतलब हमारा इन्स्पेक्शन यही तक सिमीत होगा, यहा हमे पुछताछ करनी होगी।"   चौबे म्हणाला.
"ह्या परिसराची तपासणी सुरू करा! एकेक घरात विचारा. कोणी काही विषेश पाहिलय का ?
डेड एंड म्हणजे ईथे मुल क्रिकेट किंवा काही तरी खेळत असतील जरुर! ही घटना सुमारे  च्या दरम्यान झाली. मी अजुन कोंस्टेबल मागवतो, तुम्ही घरोघरी विचारपुस करायला सुरूवात करा, काही तरी क्लु मिळेल!" इंस्पेक्टर विजयचा आत्मविश्वास वाढला!

तपास दिर्घ वेळ चालला. अखेरीस त्या बंगल्या अगोदरच्या इमारतीत एकाने सांगितले की त्या वेळेला अचानक वीज गर्जना झाली होती. हे ऐकून सगळे चक्राउन गेले. कारण पोलिसदला साठी हे नविनच ऐकायला मिळाले, शहरात कुठे ही असा प्रकार घडला नव्हता. इंस्पेक्टर विजय ने स्टेशन वर तैनात ऑफिसरला कोल केला तर वीजे-बद्दल कोणी ही कंफर्म केले नाही.
परंतू तिथे त्यांना नंतर जो कोणी रहिवासी भेटला त्याने वीज कडाडल्याची गोष्ट केली !
मग एकाने सांगितले की पुढे तो एक बंगला आहे जो कैक वर्षाने बंद आहे, तिथे नविन कोणीतरी रहायला येणार आहे !
त्यात एकाने सांगितले, "तिकडे लहान मुले होती जी खुप घाबरलेली होती, तुम्ही त्या बंगल्याच्या बाजुला बिल्डींग आहे तिथे विचारा. कसली तरी गडबड झाली होती असे मी ऐकले.!"

इंस्पेक्टर विजयने त्या इसमाच्या सांगण्यावरून शेवटच्या वसाहतीत विचारपुस केली. सुरुवातीला तिथले लोक  काही बोलायच्या मनस्थितीत नव्हते. परंतू इंस्पेक्टरने त्यांना कसे बसे बोलते केले!

त्या तीन मुलांना पण इंस्पेक्टरने खुप प्रेमाने विचारपुस केली.

मुलांचे मोठ्यांचे बोलणे ऐकुन ऐकुन पोलिस दल चक्रावून गेले, अली त्याचे मित्र देखील घाबरले!
इंस्पेक्टर विजयनी मलाडच्या पोलिस दलाची मदत मागितली. फ्लड लाईटचा बंदोबस्त करवला.

त्यांना रस्त्यावर कोणतीही खूण मिळाली नाही, ज्या प्रमाणे मुलांनी वर्णन केले होते.
शेवटी ते त्या बंगल्या जवळ आले, ज्याला कुलूप होते.

त्यांनी विचारपूस केली, रहिवासी म्हणाले कि कोणी आपटे नावाचा  मालक आहे, जो अमेरिकेत राहतो इथे दलाल आहे कोणीतरी, त्याचे भगतसिंग नगर च्या जवळ फिश मार्केट च्या जवळ कुठेतरी ऑफिस आहे.बाकी काही माहित नाही.

"त्याचे नाव काय?" इन्स्पेक्टर विजय.
बराच वेळ विचार करून एका गृहस्थाने सांगितले: "गुजराती आहे, पटेल" !

इन्स्पेक्टर विजय टीमला तपास चालू ठेवायला सांगून  सगळ्यांना आपापल्या घरी जायला सांगून दोन कॉन्स्टेबल ना घेऊन फिश मार्केट ला निघाले.

अली ने स्वाती ला फोन करून  सगळी डिटेल सांगितली. स्वाती म्हणाली, "ठीक आहे मी इन्स्पेक्टर विजयना कॉल करते. तू खूप मदत केलीस, अगदी मिसिंग लिंक मिळाली."

"एनीटाईम स्वाती, एक्च्युअली आम्हाला तिथे थांबायचे होते पण इन्स्पेक्टर नी जायला सांगितले. पण मी तुला कॉल करतो, चालेल लेट केला तर?" अली ने विचारले . स्वातीने होकार दिला.

तिला आता टेन्शन आले कि अनिरुद्धच्या घरी काय सांगायचे. तिने आपल्या वडिलांना सगळी खबर सांगितली.
"ओह ! बराच सिरीयस मॅटर झालाय. तू टेन्शन नको घेऊ, मी त्यांच्याशी बोलतो. फर्स्ट विजय ला कॉल करतो. जो पर्यंत त्याच्याशी बोलत नाही, काही क्लियर नाही."

तिथे तपासात पोलिसांना आणखी काही मिळाले नाही !
 
त्यांनी इन्स्पेक्टर विजय ना रिपोर्ट केले
इन्स्पेक्टर विजयनी तपास करणाऱ्यांची टीम ची संख्या कमी केली.
त्यांनी पटेलची ऑफिस शोधून काढली पण ती बंद होती. इन्स्पेक्टर विजय ने पटेल चा मोबाईल नंबर दुकानाच्या होर्डर वरून घेतला  त्याला त्याच्या ऑफिस वर बोलावले.
पटेल आतून घाबरला होता, तरी त्याच्या ऑफिसला आला इन्स्पेक्टर ला भेटला.
.विजयने त्याची भरपूर तपासणी केली, प्रसंगी फटके पण 
दिले
बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मागितली पण त्यांची उत्तरे तितकी समाधानकारक वाटल्यामुळे इं.विजय ने पटेलला केस साईट वर यायला सांगितले, सोबत बंगल्याची चावी घेऊन यायला सांगितले.
पटेल गुपचूप त्यांचे ऐकून को-ऑपरेट करत गेला.

"आता त्या बंगल्याचा काय स्टेटस आहे?" . विजयने कडक शब्दात पटेल ला विचारले.    
"साहेब एक नासिकचे मोटी फेमिली आहे ते येनार आहे, साहेब, सज्जन माणूस आहे तो, तुमच्यातला आहे तोआय मीन मराठी."
"नंबर नाव दे!" . विजय नि कडक शब्दात दरडावले
पटेलने आपल्या मोबाईल मधून डिटेल शेयर केली.
लगेच ते घटना स्थळी पोचले
तितक्यात तळपदें चा फोन आला
. विजय: "दादा ! मी तुम्हाला उद्या फोन करतो, तपास चालूच आहे, आत्ता काही सांगण्यासारखे माझ्या कडे काही नाही !"
तळपदे चिंतेत पडले," अर्रे! असे कसे ! इतका वेळ गेला काही खबर नाही, मुलाचे काय झाले ते तरी सांग, त्याच्या घरच्यांचा सतत फोन येतोय, नि माझ्याकडे सांगण्यासारखे काहीच नाही ! काय सांगू मी त्यांना ?"
. विजय, : "दादा! थोडा वेळ द्या मी त्या घटना स्थळी परतलोय, अद्याप तरी कोणताही सुगावा मिळाला नाही. मला वाटते कदाचित की इथे काही तरी क्लू मिळेल, मला फक्त एक तास द्या, मी तुम्हाला समोरून फोन करतोय, मॅटर खूपच  कॉम्प्लिकेटेड आहे, मी स्वतः गोंधळलोय, मी तासाभरात कॉल करतो प्लिज." असे सांगून . विजय ने पटकन फोन बंद केला!
तळपदे सोफ्यावर बसले. त्यांना परिस्थितीचे गांभीर्य कळले, ज्या पद्धतीने . विजयने फोन बंद केला त्यावरून त्यांना ही गांभिर्य कळले. समोर स्वाती उभी ! तिच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह स्पष्ट दिसत होते. घरातली इतर मंडळी देखील जमा झाली !
"स्वातीजास्त काही कळलेले नाही! पण काका तपास करतोय, घटनास्थळी आहे अजून. बापटांचा फोन आला तर मला दे, मी बोलतो त्यांच्याशी! "
"पण डेड, विजय काका काय म्हणाले? अनिरुद्ध सेफ आहे ना?" तिचे डोळे भरून आले.
"बेटा, तो स्वतः काही सांगू शकला नाही, पण तासाभराने कॉल करेल, मी त्याला आता कामात डिस्टर्ब करू शकत नाही!"
"तुम्हाला माहित आहे माझी काय हालत आहे?" आणि स्वाती ढळढळा रडू लागली.
घरात टोचणारी शांतता पसरली ! तिच्या आईने तिला आपल्या मिठीत घेतले व तिचे सांत्वन करू लागली.
                                                                                                                                                        [] [] []

"हे ते बंगला हाय!" घटना स्थळी परतल्यावर पटेल पोलिसांच्या गाडीतूनच बंगल्याकडे बोट करून म्हणाला.
"उघड!" . विजय नी बंगल्या जवळ पोहोचताच फर्मान दिले.

.विजय नी तपास टीम मधील सिनियर स्टाफ घोरपडे ला प्रोग्रेस विषयी विचारले.
"सर ! रोडवर कोणतेही स्क्रॅच मार्क नाहीत ! टायर मार्क सुद्धा नाहीत आणि ब्लड वा फ्लेश मार्क सुध्दा नाही! "
"घोरपडे! कस शक्य आहे ? जवळ जवळ पन्नास मीटर  पर्यंत आख्खी बाईक घसरत गेली ! त्या मुलाच्या पायातून रक्त सांडल असेल, मांसाचे तुकडे उडाले असतील, काचेचे तुकडे, ऑइल स्पिल, काही तरी?" . विजय ने प्रति प्रश्न केला.
"सर, तसे काहीच नाही ! आम्ही त्याच अँगेल ने तपास केला. ज्या स्पॉट वरून बाइक स्लाईड झाली, असे लोकांनी रिपोर्ट केले त्याहून वीस मीटर मागे जाऊन सुद्धा आम्ही फ्लड लाईट मध्ये संपूर्ण रस्ता चेक केला. कुठेच काहीच मिळाले नाही!"
"स्ट्रेंज !" . विजय बुचकळ्यात पडले. ते घोरपडेंना खूप वर्षांपासून ओळखत होते, त्यांना अकस्मात केसच्या घटना स्थळीची तपासणी करण्यात खूप अनुभव होता. जे काही मुलांनी सांगितले त्यावरून प्रकार खूप मोठ्या अकस्मातचा वाटत होता पण पुरावा म्हणून काहीच मिळेना ? 
कसे शक्य आहे ? कि त्या मुलांना भास झाला ? पण एकच स्टोरी तिघांच्या तोंडी ? आणि ते सुद्धा इतके बावरले होते कि ते काही खोटे बोलतील ह्या गोष्टी वर विश्वास बसत नाही आणि ती विजेचा कडकडाट ?

घोरपडेंनी विचारले,"सर! मला वाटते मुलांना भ्रम झाला असावा. त्यांच्या एका ही गोष्टीचा पुरावा मिळत नाही! अगदी वीजेची गोष्ट पण चुकीची दिसतेय."

इं. विजय काहीच बोलले नाही व पटेल कडे आले.

"हं उघड गेट !"  पटेल नी लागलीच उघडले. "होल्ड !" तपास टीम ला फ्लड लाईट सोबत आणायला सांगितले.
मेन गेट उघडला ! पूर्ण टीम ने फ्लड लाईट सोबत तपास करत पुढे गेले! अद्याप ही कुठेही त्यांना कसलाही पुरावा मिळत नव्हता !

"ओपन डोर !" . विजय ने फर्मान जारी केले !
"साहेब, रिक्वेस्ट करतो, प्लिज मला सोडा !" पटेल वैतागला होता.
"जे सांगतो ते ऐक, नाही तर कामात अडथळा आणायच्या आरोपात आत टाकून फटके घालीन!" 
पटेलच्या तोंडचे पाणी पळाले.
इं. विजय ने पायऱ्या वर फ्लड लाईट मारायला सांगितले.
मुख्य दरवाज्याच्या अगोदर आरस्पानी दगडाच्या तीन पायऱ्या होत्या, त्यावर लाईट पडताच एका रेषेत तिन्ही पायर्या तुटलेल्या आढळल्या !! सर्वात वरच्या पायर्यांवर हलकेसे खरचटलेले वळ दिसत होते !

"घोरपडे! फ्लॅश मध्ये ह्या सगळ्या मार्क्स चे सगळ्या अँगल ने फोटो पाडा. चेक करा ऑइल एलिमेंट आहे कि नाही !"
पटेल कडे वळत . विजय म्हणाले : "उघड दरवाजा! महाशय, घरी जायची घाई आहे ना तूला, मी सोडीन तुला, हॅव पेशन्स !"         
"अहो साहेबते मागे भाडोत्री आला होता राहायला, तेंव्हा तेच सामान शिफ्ट करताना लेबरचे हातून कबर्ट सरकला आणि घसरला होता तेचा हा मार्क असेल." 

आता . विजय चे डोके फिरले. रागाने एक नजर पटेल कडे पहिलेपटेल मुंडी खाली ठेऊन गप्प बसला.
"सर पेट्रोलचा वास येत नाही आणि हे जे क्रॅक आहेत ते फ्रेश पण नाहीत, त्यांची धार बोथट आहे !" 
घोरपडे म्हणाले.
"अच्छा जुने आहेत! मला रिपोर्ट पाहिजे हे मार्क किती जुने आहेत. चला आत पाहूया!" . विजय उत्तरले.
सर्व आत गेले. पण दरवाज्या शिवाय इतर कुठेही खरचटलेले निशाण दिसत नव्हते !  

. विजय ने घोरपडे सगळ्याना सगळं बंगला नीटपणे तपासायला सांगितला.
"एकेक वस्तू डिटेल मध्ये चेक करा !"
तपास चालू राहिला. . विजय ने बंगल्याच्या आतील रचने वर बारकाईने नजर टाकली.
दोन्ही बाजूने पहिल्या मजल्यावर जाणाऱ्या त्या शिड्या, त्यावर भिंतीवर वेगवेगळ्या वाहनांची फोटो. त्याविषयी पटेल कडून माहिती घेतली.
"सर! बंगल्याचे मालक आपटे ह्यांना फोर व्हिलर, टू व्हिलर हेंचा लई शोक होता."
"पुढे बोल!" इं.विजयचा आवाज... त्याच जोरात.
"तेंचा गोरेगाव स्पोर्ट्स क्लब जवळ वेहिकल डिलिंगचा बिजनेस होता, पन तेचा फेमिलीचा गोव्याला एक्सिडंट झाला, नी तेचात तेंचा आख्खा फेमिली गेली, ते टाईमाला आपटे इथेच होते म्हणून बचावले. पण लई सेड झाले, शोक घेतला साहेबानी आनी सगला विकून अमेरिकेला गेले, ओक्लसहोमा."

इं.विजय, पटेल ला सोडून तपास टीम कडे वळले. ते पाहून पटेल हळूच मागे सरकला ! कोणाचे लक्ष आपल्याकडे नाही ते पाहून त्याने खिशातून मोबाईल काढून एक मेसेज पाठवला !

डी सी पी ठाकूरचा फोन बघून इं विजय थोडा चकित झाला.
मागे वळून पहिले तर पटेल ने हलकेसे स्माईल दिले !
'सर !' इं.विजय नी फोन घेतला.
"इन्स्पेक्टर ! तुम्हाला नाशिक ची केस अटेंड करायची होती, त्याचे काय झाले?"
"सर ! एक इमर्जन्सी केस आली ते पण नात्यातले माणसे आहेत, त्यांचा मुलगा ..."
"इन्स्पेक्टर ! हे माझ्या प्रश्नाचे उत्तर नाही, रिपोर्ट मी अर्जंटली! नो एस्क्युज ! क्विक !!"
इं.विजय फोन कट झाल्याने वैतागला ! खुन्नस नी पटेल कडे पाहिले, " मी तुला ह्या केस मध्ये मेन संशयित म्हणून रजिस्टर करतोय."
पटेल उत्तरला : "साहेब ! इथे वेळ घालवू नका, नवीन केस स्टडी करायचीय ना?"   
पटेल ला गालावर सणसणीत मारायची तीव्र इच्छा इं.विजय ना झाली .पण स्वतःला सावरले.

इं.विजय नी टीम ला पेकप करायला सांगितले निघताना पटेल च्या खांद्यावर हाथ ठेवून म्हणाले : "पृथ्वीवरून अजून मंगळावर जाण्याची सोय झाली नाही, लवकरच भेटू ! पळायचा प्रयत्न केलास तर अजून अडकशील, याद राख !"  
सगळ्यांना आटोपायला सांगून इं.विजय टीम सकट तिथून निघताना हाताच्या दोन बोटानी पटेल ला इशारा केला की त्यांची त्याच्या वर नजर राहेल !
पटेल निर्विकार चेहरा करून उभाच राहिला !
गाडीत बसताच इं.विजयना तळपदें चा फोन आला. "दादा, मला थोडा वेळ द्या, खरंच खूप मोठा गुंता आहे नी ज्याच्यावर मला संशय आहे त्याची पोच डिपार्टमेंट मध्ये खूप वरची दिसतेय, पण तुम्ही tension घेऊ नका, मी स्वतःहून मॅटर हातात घेतो. केस वाटते तितकी सोपी नाही, काही तरी मोठी गडबड आहे, पण आता मला वरून ऑर्डर आले आहेत, केस साईड ला करायला माझ्यावर प्रेशर आलय."

तळपदे निशब्द झाले, " विजय, मी धनंजय आपटे ना काय सांगू? त्याचा सारखा फोन येतोय मला, मी काही नाही सांगितले तर ते इथे येतील. त्यांची पोच पण खूप आहे!"
"दादा, मग तर बरे झाले, हि केस दाबली जाणार नाहीपरंतु केस साईट वरची प्रत्यक्ष दर्शी लहान मुले जे सांगतात त्याला पुरावा काहीच नाही. मला अर्जन्टली नाशिक ला जायचे आहे, तुम्ही आपट्याना ह्या मॅटर मध्ये जातीने लक्ष द्यायला सांगा, त्यांचे इथे येणे आता गरजेचे झालय, प्लिज मला कळवा, जमल्यास त्यांचा नंबर शेयर करा. मी त्यांच्या मदतीने ही  केस सॉल्व करिन !"
"अरे पण विजय, तो मुलगा नक्की गायब कुठे झाला?" तळपदेंना गोंधळल्या सारखे झाले.
"दादा, मी पोलीस स्टेशन मध्ये तपास लावतो, मलाडच्या पश्चिमेला एखादा रोड ऍक्सिडंट झाला का ते तपासतो, पण सध्या तरी ह्या केस मध्ये हॉल्ट आलाय. सोरी दादा, पण ह्या क्षणाला माझा नाइलाज आहे. पण एक रिक्वेस्ट करतो! तुम्ही आपटेंना इथे बोलावुन घ्या मुलाची मिसिंगची FIR नोंदवायला सांगा. म्हणजे तपास मध्ये अडथळा नाही येणार."
"अरे बापरे!" तळपदेंना तर घेरी आल्यासारखे वाटले.
"दादा! प्लिज त्यांचा नंबर मला शेयर करा, मी त्यांना गाईड करतो." इं. विजयने समजवण्याचा प्रयत्न केला.
तळपदे म्हणाले: "मी बोलतो त्यांच्याशी, पण अवघड आहे रेएकुलता एक मुलगा, ऐन तारुण्यात मुंबईत सेटल.  अरे आत्ताच त्याची जॉबला प्रमोशन झाली होती व त्याच खुशीत तो डीमार्ट ला जात होता, आणि अचानक हे गुढ!"

"दादा, मी इंस्ट्रक्षन देतो, ह्या परिसरात वा पुर्ण मलाड पश्चिमेला एखादा रोड एक्सिडेंट झाला आहे का ह्या गोष्टीचा ही तपास लावतो, इथे जर तो आलाच नसेल तर !" इं. विजय म्हणाले.
"ठिक विजय, मला कधी कळेल?" "दादा, उद्या सकाळी मलाड पोलिस स्टेशन हून तुम्हाला फोन येईल. सध्या आपट्यांचे इथे येणे गरजेचे आहे, त्यांच्याशी बोलुन त्यांच्या ओळखीचा कितपत फायदा होतोय ते पहायचे आहेत्यांच्या ओळखीने मला परत ह्या केसवर अटेंड करायची संधी मिळेल.

तळपदेंना इं. विजय शी बोलताना इनकमिंग कॉल ची ट्यून ऐकू येत होतीत्यांनी इं. विजय ला तसे सांगून लाईन कट केली. अपेक्षे प्रमाणे पुण्याहून बापट ह्यांचे इनकमिंग कॉल होता.
समोर स्वातीचा चेहरा तर दुसरी कडे बापटांचा फोन. तळपदे विचारात पडले !
"हे बघ बेटा, काही तरी सिरीयस मामला झाला आहे, अनिरुध्ध चा शोध लागत नाही, त्यात विजयला उद्या नाशिकच्या केस मध्ये त्याच्या सिनियर्स नी गुंतवले आहे, जाणून बुजून केस दाबायचा प्रयत्न चाललाय, तरी विजय नी बापटांना इथे यायला सांगितले आहे. जो पर्यंत पुढे डेव्हलप होत नाही, तोपर्यंत सध्या तरी काही सांगता येत नाही."
बोलताना तळपदेंनी मुलीला कुशीत घेतले, जेणेकरून त्यांचे पाणावलेले डोळे तिला दिसू नये !
तिने प्रश्नांची बरसात केलीपण तिच्या बाबांकडे कोणतेही उत्तर नव्हते.
तितक्यात बापटांचा फोन परत आला !
"बापट साहेब! मी तुम्हाला अंधारात नाही ठेवत, पोलिसांचा तपास मध्येच थांबवण्यात आला नी तपास करणाऱ्या इन्स्पेक्टर ला दुसऱ्या केस मध्ये गोवत आहेत. अनिरुध्ध चा सध्या तरी पत्ता मिळत नाही. तुमची मुंबई पोलिसात एखाद्या मोठ्या ऑफिसर शी ओळख आहे का?"
"धनंजय राव, माझ्या मुलाचे नक्की काय झाले? जवळ जवळ सहा तास झाले अजून शोध चालू आहे? खरं काय आहे? तुम्ही काय लपवतात? व का लपवतात?"
"बापट साहेब! मी काही ही लपवत नाही, तुम्हाला आवर्जून विनंती करतो, शक्य तितक्या लवकर तुम्ही इथे या, मी तुम्हाला माझा ऍड्रेस व्हॉट्सप करतो."
"तुम्ही आत्ताच द्या, मी लागलीच निघतो. NCP च्या शिक्षण मंत्री वर्षा मॅडमचे सेक्रेटरी माझ्या ओळखीचे आहे, मी त्यांना कॉल करतो, ते नक्की काही तरी करतील."
"बापट साहेब, मग तर आपले काम होईल ! आपण नक्की अनिरुध्ध ला सकाळी शोधू, पण त्याचा फोन पण स्वातीला लागत नाही !"         

"हो! आम्हाला पण एंगेज लागतोय, म्हणून तर जीव वर-खाली होतोय, मनात कालवाकालव होतेय. पण स्वतः स्वतःची समजूत काढून देवावर सोडतोय. माझा मुलाला परमेश्वर जरूर वाचवेल !" बापटांना अश्रू अनावर झाले.

बापट आपल्या छोट्या भावाला, संजय ला सोबत घेऊन तासाभरात मुंबईला बाय रोड रवाना झाले!, ते वर्षा मॅडमच्या सेक्रेटरीशी बोलून निघाले. सेक्रेटरीने त्यांना काही सूचना दिल्या.

                                                                                                                                                       [] [] []



1 comment:

Ramesh Kumar M.G said...

I cannot read Hindi, please send me in English only