भिलवाडा: - एक रोल मोडेल:
कोविड-१९ म्हणजे कोरोना वायरस डिसीज ह्या भयंकर महामारीने संपुर्ण जगात हाहाकार माजवलाय, मिनीटा गणीक जगात एक इसमाचा म्रुत्यु होत आहे.
भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदींनी देशभरात २५ मार्च २०२० रोजी २१ दिवसाचे लॉकडाउन म्हणजे स्वबंधितवस्था लागू केली.
कारण देश ह्या महामारीच्या प्रथम चरणात होता. वेळीच लागू केलेली स्वबंधितवस्था वा पुर्णपणे संचारबंदी लागू करण्याचे कारण आपल्या देशात स्वास्थसेवा संपुर्ण लोकसंख्येला खुपच अपुरी पडणारी होती. जिथे महाशक्ती अमेरिकेत उच्च प्रकारची स्वास्थ सेवा असून ही, भयावह परिस्तिथी उद्भवलेली आहे, तिथे भारताची काय गत?
जगात महासत्ता असलेली अमेरिका व तिच्याशी व्यापार युद्ध करून महासत्ता बनण्यास आसुसलेला चिन ह्यांचा संघर्ष ह्या वैश्विक महामारीचे कारण बोलले जाते. ह्या दोन्ही देशात अमाप नुकसान झालेय. त्यात चिनने ह्या वायरसवर बर्यापैकी नियंत्रण मिळवले. परंतू अमेरीकेत मात्र वेळेवर खबरदारी व उपाय योजना न केल्यामुळे परिस्थिति हाताबाहेर गेली व ही महासत्ता ह्या विषाणुपुढे अक्षरश: हतबल झाली.
ह्या शिवाय युरोपात देखिल ह्याची खुपच मोठ्या प्रमाणात लागण झाली, जी त्यांच्या चुकीच्या निर्णयामुळे हाता बाहेर गेली. इंग्लैंड चे पंतप्रधान देखील होस्पिटलात अति दक्षता विभागात भर्ती झाले, इंग्लैंड चे प्रिंस चार्ल्स देखील रोगग्रस्त झाले.ज्यावरून हे सिद्ध होते की हा रोग किती संसर्गजन्य आहे.
ह्या शिवाय युरोपात देखिल ह्याची खुपच मोठ्या प्रमाणात लागण झाली, जी त्यांच्या चुकीच्या निर्णयामुळे हाता बाहेर गेली. इंग्लैंड चे पंतप्रधान देखील होस्पिटलात अति दक्षता विभागात भर्ती झाले, इंग्लैंड चे प्रिंस चार्ल्स देखील रोगग्रस्त झाले.ज्यावरून हे सिद्ध होते की हा रोग किती संसर्गजन्य आहे.
परंतू साउथ कोरिया, सिंगापुर व जिथून ह्या रोगाची लागण झाली तो चिन देखिल ह्या कोरोनाला नियंत्रित करण्यात यशस्वी झाले.
मित्रानो, मी तुम्हाला इतके दुर नेण्या ऐवजी भारतातच एका ठिकाणी काय व कसा चमत्कार झाला त्यावर बोलू.
राजस्थान मधिल मेवाड मध्ये जयपुर पासुन २५० कि.मी. अंतरावर वसलेले भिलवाडा ह्या शहराची ही कथा आहे. कसे भिलवाडा देशात एक रोल मोडेल बनलय ? चला ह्या रोमहर्षक व अथक प्रयत्ना अंती झालेल्या चमत्काराविषयी जाणून घेउया.
भिलवाडा हे शहर कोरोनाचे केंद्रबिंदू बनले होते. त्यानंतर अनेक खबरदारी घेउन, पुढच्या सलग सात दिवसात हा संसर्गजन्य रोग वाढला नाही. एक ही नविन केस नोंदली गेली नाही !
ह्या गोष्टीचा इतका सकारात्मक परिणाम झाला की देश भर ही महामारी नियंत्रणात आणण्यासाठी देशाच्या राजधानी- दिल्लीत ज्या उपाय योजना आखल्या गेल्या, ज्या बैठका केंद्र सरकार व राज्य सरकार घेत गेले, त्यात भिलवाडाच्या रोल मोडेलचा वारंवार उल्लेख होतोय.
चला पाहुया, काय आहे हा भिलवाडा रोल मोडेल?,
त्यांनी कशा खबरदार्या घेतल्या, कशी पाउले उचलली व कसे हे महाअभियान सफळ करण्यात, कसे त्यांना अविश्वसनीय यश प्राप्त झाले, हे पाहुया.
पाहुया, काय व कसे घडले?
जयपुरच्या एका होस्पिटलात एका ज्येष्ठ नागरिकाचे वयाच्या 52व्या वर्षी निधन झाले. त्याला प्राथमिक चाचणीत निमोनीया झाला होता असे सांगण्यात आले, परंतु होस्पिटल मध्ये कळले की त्याला कोरोनाचे संक्रमण लागू झाले होते,ज्यामुळे त्याचा म्रुत्यु झाल्याचे निष्पन्न झाले. त्या अगोदर त्या व्यक्तीने भिलवाड्यात एका खाजगी इस्पितळात उपचार केले होते. तिथल्या डोक्टराचे निदान देखिल कोरोनाचेच होते, ज्यामुळे त्याचे उपचार करणारे डोक्टर व नर्स देखिल संक्रमित झाले.
असे झाले भिलवाडा एक रोल मोडेल :
त्या रुग्णाच्या निधना नंतर कोरोना संक्रमणाचे 17 नवीन मामले पुढे आले व भिलवाडा प्रशासन खडबुन जागे झाले.
सर्व प्रथम त्यांनी वरच्या सरकारी पातळी वर ही बातमी कऴवली व 20 मार्चला,जेंव्हा देशात देखिल संचारबंदी लागू नव्हती, तेंव्हा त्यांनी शहरात लॉकडाउन लादले. शहराच्या सीमा बंद करून टाकल्या. न कोणी शहरात येउ शकत होते न कोणी शहर सोडू शकत होते.ह्यात शहराचे कलेक्टर श्री. राजेंद्र भट्ट ह्यांनी संपुर्णपणे पुढाकार घेतला.
राज्याचे अतिरीक्त स्वास्थ सचिव श्री. रोहितकुमार सिंह ह्यांनी सांगितले:
"आम्ही ह्या अंम्मलबजावणीला सहा भागात विभागले.
१. संपुर्ण जिल्ह्याला वेगळे पाडणे;
२. होस्पिटल ठरवणे;
३. प्रत्येक घरी जाउन प्रत्येक व्यक्तिची वैद्यकिय तपासणी व नोंद करणे ;
४. प्रत्येक व्यक्तिकडून त्याच्या काही दिवसाची संपर्क माहिती, म्हणजे तो कोणा-कोणाला व कुठे भेटला,आदी नोंदणे;
५. विलगीकरण म्हणजे क्वारंटाइन व अलगाव म्हणजे आयसोलेशन अमलात आणणे;
६. शहरातील संक्रमण मामल्यांची सरकारी नोंद करणे.
श्री. रोहितकुमार सिंह पुढे म्हणाले:
"आम्ही संपुर्ण भिलवाडाचे सीमेवरचे संपर्क तोडून टाकले, शहराची सीमा ब्लोक केली, नाकाबंदी केली व जमावबंदी केली, कलम १४४ लागू केला.
कारण लोकांचे आयुष्य हे त्यांच्या असुविधेपेक्षा अधिक मौल्यवान आहे."
कारण लोकांचे आयुष्य हे त्यांच्या असुविधेपेक्षा अधिक मौल्यवान आहे."
"देशात लॉकडाउन सुरू व्हायच्या चार दिवस अगोदर म्हणजे 20 मार्चला, शहराच्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या. तसेच जवळपासच्या सर्व जिल्हाधीकार्यांना लिखीत विनंती वजा सुचना देण्यात आल्या की त्यांनी मेवाडशी संलग्न असलेल्या सीमा बंद वा सील कराव्या.
शहरात कलम 144 लागू करण्यात आले. फक्त जीवनावश्यक वस्तूंचीच दुकाने उघडी ठेवलीत. सरकारी व खाजगी वाहने, ट्रेन व बस संपुर्णपणे बंद ठेवण्यात आले. सर्व व्यापारी प्रतिष्ठाने, सरकारी ओफिस व कारखाने बंद करण्यात आले.शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आली.
पुढचे पाउल म्हणून शहरात कोरोनाग्रस्तांचा सपशेल शोध कसा घ्यावा, विलगीकरण व केमिकल अौषधांचा फवारा, ह्या गोष्टीवर निर्णय झाला.
सर्व प्रथम, आम्ही सगळ्या स्वास्थ कर्मीची विभागणी केली.एकुण 1937 स्वास्थकर्मींच्या तीन तुकड्या बनवण्यात आल्या.
ह्या तुकडीने साडे चार लाख घरात जाउन प्रत्येक नागरीकाची चाचणी केली, त्याचे रेकोर्ड नमुद केले.
शहराला तीन विभागात मोडले.
पहिल्या भागात एक किलिमीटर त्रिज्यात (रेडियस) येणारे क्षेत्र आखले.
दुसरा भाग त्या पुढील तीन किलोमीटर व तिसरा भाग, त्या पुढील पाच किलोमीटर, असे स्वास्थकर्मीं साठी क्षेत्रांचे वाटप केले.
सर्व प्रथम, एक किलोमीटर क्षेत्रात मोडणारा प्रभाग ह्यावर विशेष जोर लावला कारण केंद्रस्थानी लोकसंख्या सर्वाधिक आहे, इथे हेवी सर्विलांस म्हणजे अतिशय बारकाइने तपासणी करण्यात आली. ह्या क्षेत्रातल्या सर्व सुविधा रद्द करुन कडक रीत्या कर्फ्यू लावला गेला. लोकांना सक्तीने घरात रहायला लावले.
जीवनावश्यक वस्तू घरपोच करण्यात आल्या.
शहराचे सर्व रस्ते, गल्ल्या व बोळ स्वच्छ करण्यात आले. नंतर सर्वत्र रासायणीक फवारे करण्यात आले.
अशा प्रकारे संपुर्ण शहर निर्जंतुक म्हणजे डिसइंफेक्ट करण्यात आले.
तसेच तिन्ही हेल्थ तुकडीने शहरातील तब्बल साडे-बाविस लाख लोकांना तपासले ! सुरवातीला साध्या फ्लुचे सोळा हजार पेशंट आढळले. त्यांच्यावर नजर ठेवण्याची सोय केली गेली. कारण ह्या सर्वांचे विलगीकरण म्हणजे क्वारंटाइन करणे जरुरी होते.
ह्या साठी कोरोना बाधीत पेशंट साठी निवडलेल्या सरकारी होस्पिटला शिवाय चार खाजगी होस्पिटल तसेच शहरातील 27 मोठ्या होटेलात अलगाव म्हणजे आयसोलेशनची सोय़ केली गेली.
7600 लोकांना फ्लुची लागण होती. ते फ्लूच्या पुढच्या स्टेजला पोहोचले हे सिद्ध झाले! काही दिवसांनी परत एकदा चाचणी करण्यात आली ज्यात दोन हजार लोकांना अद्याप फ्लूची लागण दिसली."
पुढचे पाउल:
"प्रशासनाने वैद्यकीय पथकाना चाचणी चालू ठेवण्यास सांगितले. सोबत कर्फ्यू लागूच होता.अखेर 27 जणांचा कोरोना प्राथमिक स्तरावर सिद्ध झाला. ह्यात नंतर दोन जण दगावले.
अजुन काही दिवस गेले व 13 जण ह्या संक्रमणातून मुक्त झाले. त्यांना घरी पाठवून दिले. इतरांचा इलाज विलगीकरण केंद्रात चालू राहीला. पुढे सात दिवस निघुन गेले, परन्तु शहरात कोरोना ची नविन केस नमुद झाली नाही !
भिलवाडा प्रशासनाने ह्या मोहिमेत जातीने पाउल उचलले व यशस्वी रीत्या त्याची अंमलबजावणी केली. विशेष म्हणजे शहरा बाहेरून कसलीही व कोणाचीही धार्मिक, राजकीय वा सामाजिक लुडबुड होउ दिली नाही."
(नेमकी हीच चूक मात्र देश बाबतीत झाली).
ह्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागल्यावर टप्प्या टप्प्याने शिथिलीकरण करण्यात आले.
प्रथम, तीन किलोमीटर क्षेत्रात काही प्रतिबंध उठवण्यात आले.
प्रथम, तीन किलोमीटर क्षेत्रात काही प्रतिबंध उठवण्यात आले.
पाच किलोमीटर क्षेत्रात त्याहून ही अधिक ढिलाइ देण्यात आली.
श्री रोहितकुमार सिंह पुढे म्हणाले.
ह्यात शहराच्या प्रशासनाने वीना मुल्य सेवा देउन सर्वात प्रभावी पाउल उचलले. शिवाय जिल्हा प्रशासन निर्णय घेण्यात पुर्णपणे स्वतंत्र होता, हे खुप महत्त्वाचे आहे.
अशा तर्हेने संपुर्ण देशात लॉकडाउन म्हणजे संपुर्ण संचारबंदी घोषित करायच्या अगोदरच भिलवाड्यात परिस्थितीवर अंकुश आणण्याचे काम सुरू झाले. शिवाय अंमल बजावणीत कोणाचीही व कोणत्याही प्रकारची लुडबुड होउ दिली नाही, हे विशेष!
अन्यथा आपण पाहतच आलोय की कशा तर्हेने देशात काही विशेष धर्माच्या लोकांनी अनुशासन न पाळल्यामुळे
परिस्थिति काही प्रमाणात होता बाहेर गेली व जगभरात कोरोनाच्या तालिकेत, भारत 41 व्या स्थानावरून अवघ्या तीन-चार दिवसातच म्हणजे 7 एप्रिल 2020 रोजी 24 व्या स्थानी पोहोचला. व परिणामी दोन महिन्यात प्रथम पाच मध्ये आपला क्रमांक लागला.
परंतु भिलवाड्यात वरील यशस्वी उपाय योजनेमुळे कोरोना ग्रस्तांची संख्या 27 च्या पुढे गेलीच नाही !
तसे देशाप्रमाणे इथे देखिल लॉकडाउन पुढील काळासाठी चालू ठेवले. संपुर्ण कर्फ्यू देखिल चालू ठेवण्याचा प्रशासनाने निर्णय घेतला आहे. ना कोणी घराबाहेर पडला न कोणी बाहेरून शहरात आला.
जरी शहरातच कोणी कोणाच्या घरी गेला तरी त्याची माहिती शासनाला पुरवणे बंधनकारक ठेवले. जेणेकरी वैद्यकिय पथक त्यांची चाचणी करेल.
तसे देशाप्रमाणे इथे देखिल लॉकडाउन पुढील काळासाठी चालू ठेवले. संपुर्ण कर्फ्यू देखिल चालू ठेवण्याचा प्रशासनाने निर्णय घेतला आहे. ना कोणी घराबाहेर पडला न कोणी बाहेरून शहरात आला.
जरी शहरातच कोणी कोणाच्या घरी गेला तरी त्याची माहिती शासनाला पुरवणे बंधनकारक ठेवले. जेणेकरी वैद्यकिय पथक त्यांची चाचणी करेल.
शहराच्या नागरिकांची समज खरोखरच वाखाणण्या जोगी आहे. कारण खाण्यापुण्याची सोय घरपोच होत आहे.
अखेर जिल्हाधिकारी व वैद्यकीय पथक ह्यांच्या अथक प्रयत्नाला यश मिळाले, ज्यात नागरिकांची समज व अनुशासनामुळे कोरोना सारख्या महाभयंकर महामारीला वेळीच रोखण्यात यश मिळाले.
वरील कोरोना मामल्या व्यतिरिक्त कोरोनाचे नविन मामले आलेच नाही!
जिथे विश्वातल्या महाशक्ति ह्या महामारीपुढे निष्प्रभ ठरल्या तिथे भिलवाडाच्या लोकानी खरोखरच एक चमत्कार घडवून आणला !
व हे भिलवाड़ा, केवळ देशासाठीच नव्हे तर सम्पूर्ण जगासाठी एक रोल मॉडल बनले!
https://www.youtube.com/watch?v=IuiLrsvcuzw
Vilas Ekbote
08796212032
08928233871


2 comments:
Nice words insident from beginning
Excellent.....The other places should follow this model..
Post a Comment